मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Alert: RT-PCR चाचणी निगेटिव्ह, तरीही कोरोनाची लक्षणं दिसतायत? AIIMS च्या तज्ज्ञांनी केलं सावध

Alert: RT-PCR चाचणी निगेटिव्ह, तरीही कोरोनाची लक्षणं दिसतायत? AIIMS च्या तज्ज्ञांनी केलं सावध

कोरोनाचा संसर्ग झालेला असूनही रिपोर्ट निगेटिव्ह (False negative covid report) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याबद्दल AIIMS च्या संचालकांनी सावध केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेला असूनही रिपोर्ट निगेटिव्ह (False negative covid report) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याबद्दल AIIMS च्या संचालकांनी सावध केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेला असूनही रिपोर्ट निगेटिव्ह (False negative covid report) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याबद्दल AIIMS च्या संचालकांनी सावध केलं आहे.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा विषाणू (New Strain of Coronavirus)कोरोना चाचणीला अगदी आरटी-पीसीआर(RT-PCR Test)चाचणीलाही चकवतो आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेला असूनही रिपोर्ट निगेटिव्ह (False negative covid report) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही कोविड-19 ची लक्षणं (What if Symptoms remain even after negative corona RT-PCR test)जाणवत असतील, तर अशा व्यक्तींनी कोरोचा संसर्ग झाला आहे असं समजूनच योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. तसंच अशा व्यक्तींवर उपचारही त्याच पद्धतीने व्हायला हवेत, असा सल्ला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS director Dr Randeep Guleria)यांनी दिला आहे. डॉ. गुलेरिया हे कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्यही आहेत.

    कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of coronavirus) या विषाणूचा नवा स्ट्रेन (Mutated Coronavirus strain)खूपच संसर्गजन्य आहे. निरोगी व्यक्ती एका मिनिटासाठीही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली, तरी त्या व्यक्तीपासून संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. त्यामुळेच कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांवर कोविड प्रोटोकॉलनुसारच उपचार व्हायला हवेत, असं त्यांनी सुचवलं.

    कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे चाचण्यांचे रिपोर्ट मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टर्सनी निदानासाठी क्लिनिको-रेडिऑलॉजिकल डायग्नॉसिस (Clinico-Radiological Diagnosis)पद्धतीचा अवलंब करावा. सीटी-स्कॅनमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं दिसली, तर कोविड-प्रोटोकॉलच्या (Covid Protocol)अनुषंगाने उपचार सुरू केले पाहिजेत,असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.

    सत्ताधारी भाजप आमदारालाच 24 तास मिळाला नाही ICU बेड; कोरोनाने झाला मृत्यू

    चव आणि वास न येणं, दमल्यासारखं वाटणं, ताप, थंडी वाजणं, अॅसिडिटी किंवा गॅसेस होणं, घशात खवखवणं अशी लक्षणं कोविड रुग्णांमध्ये दिसून येतात.

    फॉल्स निगेटिव्ह (False Negative)रुग्णांची संख्या का वाढतेय?

    स्वॅब घेण्यात चूक होत असल्यामुळे RT-PCR चाचणीचा निकाल चुकीचा लागत असल्याचं अनेकदा घडत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. स्वॅब चुकीच्या पद्धतीने घेणं, स्वॅब योग्य पद्धतीने साठवला न जाणं, स्वॅबची चुकीच्या पद्धतीने वाहतूक आदींमुळे आरटी-पीसीआर चाचणीचे निकाल चुकीचे येण्याचं प्रमाण वाढत आहे.

    617 कोरोना व्हेरिएंट्सवर भारी COVAXIN; भारतीय कोरोना लशीबाबत अमेरिकन तज्ज्ञांचा मोठा दावा

     विषाणूमध्ये झालेलं म्युटेशन अर्थात जनुकीय बदल हेही चाचणीचा निकाल चुकण्यामागचं एक कारण असू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात. शरीराची प्रतिकारयंत्रणा डबल म्युटंट व्हायरसला (Double Mutent Coronaivirus) ओळखू शकत नाही. त्यामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. त्याचप्रमाणे म्युटेटेड व्हायरस (Mutated Virus)आरटी-पीसीआर चाचणीच्या कक्षेत येत नसल्याचीही शक्यता आहे.

    या सगळ्या कारणांमुळे कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या सर्वांनीच योग्य ती काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

    First published:

    Tags: AIIMS, Coronavirus, Coronavirus symptoms