Home /News /heatlh /

डायबेटिसच्या रुग्णांनी जास्त आंबे खाल्ले तर काय होतं? हंगाम संपला तरी ही गोष्ट नेहमी ठेवा लक्षात

डायबेटिसच्या रुग्णांनी जास्त आंबे खाल्ले तर काय होतं? हंगाम संपला तरी ही गोष्ट नेहमी ठेवा लक्षात

डायबेटिसच्या रुग्णांनी जेवणानंतर आंबा कधीही खाऊ नये. कारण, आंबा खाल्ल्यानंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण लगेच वाढतं. तुम्हाला डायबेटिस असेल तर खूप कमी प्रमाणातच तुम्ही आंबा खा.

मुंबई, 06 ऑगस्ट : उन्हाळ्याचा हंगाम आंबे न खाता गेलाय असं तुमच्या आयुष्यातही क्वचितच झालं असेल. अर्थात सगळ्यांनाच आंबा आवडतो, असं नाही. पण, ज्यांना आवडतो ते तर आवर्जून उन्हाळ्यात रसदार आंब्यांवर ताव मारतातच. पण हा फळांचा राजा आंबा शरीराला उपयुक्त असला तरीही तो कधी, किती आणि कशा पद्धतीने खावा याबद्दल अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. काही जण म्हणतात अनुशापोटी आंबा खाऊ नये. काही जण सांगतात आंबा कधीही खा बिनधास्त! पण खरं काय ते आज आपण जाणून घेऊ या. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. डाएट इनसाईटच्या को फाउंडर डाएटिशियन लवलीन कौर यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, रिकाम्यापोटी आंबा खाण्याचा शरीराला काहीही त्रास होत नाही कारण आंबा शरीराला उर्जा देतो. पण त्यांनी हेही सांगितलं की रिकाम्यापोटी अति प्रमाणात आंबा खाऊ नये. त्या म्हणाल्या,‘हो, रिकाम्यापोटी आंबा खाणं योग्य आहे. आपल्या शरीराला सकाळी अल्कलाईन अन्नाची गरज असते, त्यामुळे सकाळी आंबट फळं खाण्यापेक्षा गोड फळांनी केली तर चालू शकते. जेवण झाल्या-झाल्या आंबा खाऊ नये तसंच झोपण्यापूर्वीही आंबे खाऊ नयेत. या वेळी आंबा खाल्ल्यास रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं म्हणून जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी आंबे खाऊ नयेत.’ लवलीन यांनी आणखी माहिती दिली. त्या म्हणाल्या,‘ डायबेटिसच्या रुग्णांनी आंबा खायला हरकत नाही पण त्यांनी थोडी काळजी घ्यायला हवी. या रुग्णांनी आंब्यांबरोबर फायबर असलेले पदार्थ म्हणजे नट्स, काही फळांच्या बिया असे पदार्थ खावेत म्हणजे शरीरातील ग्लायसेमिक लोड संतुलित करायला मदत होते. त्याचबरोबर त्यांनी हंगामाच्या सुरुवातीला येणाऱ्या आंब्यांचं सेवन करू नये, कारण त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ असू शकते.’ क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, बेंगळुरुच्या चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अभिलाषा वी म्हणाल्या की, बरेच जण नाश्त्याच्या वेळेला आंबा खातात. पण डायबेटिस आणि IBS (Irritable Bowel Syndrome)च्या रुग्णांनी थोडी काळजी घ्यायला हवी. त्या म्हणाल्या,‘ सकाळी तुम्ही आंब्याची स्मूदी किंवा लस्सी पिऊ शकता. संध्याकाळी आंबा मिल्कशेक आणि रात्रीच्या जेवणानंतर गोड म्हणून तुम्ही आंबा नक्कीच खाऊ शकता. फक्त एवढं ध्यानात ठेवा की रात्रीच्या जेवणानंतर अति आंबा खाऊ नका. जर तुम्ही प्रमाणात आंबा खाल्ला तर तो कुठल्याही वेळी खाल्लात तरीही त्याचा शरीराला अपाय होत नाही.’ हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत डायबेटिसच्या रुग्णांनी जेवणानंतर आंबा कधीही खाऊ नये. कारण, आंबा खाल्ल्यानंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण लगेच वाढतं. तुम्हाला डायबेटिस असेल तर खूप कमी प्रमाणातच तुम्ही आंबा खा. त्याचबरोबर IBS (Irritable Bowel Syndrome) आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर रिकाम्या पोटी आंबा खाऊ नका. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान म्हणाल्या,‘ आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की रिकाम्यापोटी आंबा खावा का? तर त्याचं उत्तर आहे हो, खावा. पण ज्यांना इन्शुलनि रेझिस्टन्सचा त्रास किंवा हायपरग्लायसेमिया (रक्तातली उच्चीची साखर) हे आजार आहेत त्यांनी मात्र रिकाम्यापोटी आंबा खाऊ नये. इतर सगळे जण जेवणानंतर आंबा खाऊ शकतात. पण आंबे ऑरगॅनिक असावेत हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर काहीही खाण्याआधी एक ग्लास साधं पाणी किंवा लिंबाचा रस प्यायला हवा म्हणजे पदार्थ खाण्याआधी आपली पचनसंस्था सक्रिय होते.’
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या