Home /News /heatlh /

वारंवार विसरण्याची सवय अल्झायमरचे संकेत तर नाहीत? ही आहेत लक्षणं

वारंवार विसरण्याची सवय अल्झायमरचे संकेत तर नाहीत? ही आहेत लक्षणं

बहुतांश वेळा आपण एखाद्या शारीरिक समस्येकडे किंवा आजाराकडे दुर्लक्ष करतो. फार गरज वाटल्यास अशा समस्येवर तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार घेतो; पण काही आजार असे असतात की जे पहिल्या टप्प्यात सामान्य वाटतात; पण भविष्यकाळात त्यांची तीव्रता वाढून गंभीर होतात. अल्झायमर (Alzheimer) हा त्यापैकीच एक आजार (Disease) आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 28 जानेवारी : बहुतांश वेळा आपण एखाद्या शारीरिक समस्येकडे किंवा आजाराकडे दुर्लक्ष करतो. फार गरज वाटल्यास अशा समस्येवर तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार घेतो; पण काही आजार असे असतात की जे पहिल्या टप्प्यात सामान्य वाटतात; पण भविष्यकाळात त्यांची तीव्रता वाढून गंभीर होतात. अल्झायमर (Alzheimer) हा त्यापैकीच एक आजार (Disease) आहे. एखादी गोष्ट किंवा अगदी अलीकडची घटना तुम्ही विसरत असाल आणि असा अनुभव वारंवार येत असेल तर ही लक्षणं कदाचित अल्झायमरची असू शकतात. अशी लक्षणं वाढण्यापूर्वीच योग्य वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार आवश्यक आहेत. अल्झायमर होण्यामागे काही कारणं असू शकतात; मात्र हा आजार होऊ नये यासाठी जीवनशैलीत काही बदल करणं आवश्यक आहे. अल्झायमर हा एक प्रकारचा मानसिक आजार (Psychological Disease) आहे. यामुळे पीडित रुग्णाची स्मरणशक्ती (Memory) हळूहळू कमजोर होत जाते. या प्रकारामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. बऱ्याचदा मध्यम वयात किंवा वृद्धापकाळात मेंदूच्या ऊतींवर (Brain Tissues) प्रतिकूल परिणाम झाल्यानं हा आजार होतो. अल्झायमर हा डिमेन्शिया (Dementia) म्हणजेच स्मृतिभ्रंशाचा सामान्य प्रकार मानला जातो. यामुळे संबंधित व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात हा आजार तरुणांमध्येही दिसून येत आहे. संशोधकांच्या मते, अल्झायमर या आजारात मेंदूला जागृत ठेवणारे भाग कमकुवत होतात. यामुळे संबंधित व्यक्तीला विसरण्याची सवय लागते आणि हीच सवय अल्झायमरचं रूप घेते. या आजाराचे रुग्ण दिवसा जास्त प्रमाणात झोपू लागतात. मेंदूचा जो भाग आपल्याला दिवसा जागृत ठेवतो, तो टाऊ (Tau) नावच्या प्रोटीनमुळे (Protein) खराब होतो. हे प्रोटीन अल्झायमर या आजारात महत्त्वाची भूमिका बजावतं. अल्झायमर होऊ नये म्हणून व्यसनांपासून (Addiction) दूर राहणं आवश्यक आहे. तुम्ही मद्यपान करत असाल तर त्याचा मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मद्यपान टाळणं आवश्यक आहे. तसंच आहारात हिरव्या पालेभाज्या, सुक्या मेव्याचा समावेश करणं गरजेचं आहे. काही जणांना रात्रीच्या वेळी झोप न येण्याची समस्या असते. यामुळे मेंदूवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्ही सतत मोबाइलवर बिझी असाल, तर त्या वेळाचा वापर तुमच्या कुटुंबीयांशी, प्रिय व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी करा. वय वाढलं म्हणून अजिबात रिकामं बसू नका. नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र ठेवा. नव्या गोष्टी शिका. तुमचा मेंदू पूर्णपणे सक्रिय ठेवा. यामुळे अल्झायमर दूर राहण्यास मदत होते. खरं तर प्रत्येकानं तणावमुक्त (Stress Free) जीवन जगणं आवश्यक आहे. सर्व प्रकारचे ताण-तणाव दूर ठेवणं आवश्यक आहे. घटस्फोट, जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा नोकरी गमावणं आदी गोष्टींचा परिणाम अनेकांवर होतो आणि ते अधिक प्रमाणात विचार करू लागतात. यामुळे अल्झायमर होण्याची शक्यता वाढते. इतकंच नाही तर महिलांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचा आणि अल्झायमरचा धोका वाढत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या आजारापासून दूर राहण्यासाठी योग्य आहार, ताण-तणावाचं व्यवस्थापन, पुरेशी झोप आणि व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
First published:

पुढील बातम्या