मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Weight Loss Tips: एका आठवड्यात वजन होईल कमी; कोचकडून जाणून घ्या चरबी कमी करण्याचे उपाय

Weight Loss Tips: एका आठवड्यात वजन होईल कमी; कोचकडून जाणून घ्या चरबी कमी करण्याचे उपाय

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

वजन कमी होतं; पण ते पुन्हा वाढण्याचा धोका असतो. काही साइड इफेक्ट्सही उद्भवू शकतात. म्हणूनच वजन योग्य प्रकारे कमी कसं करता येईल, याविषयीचे उपाय तज्ज्ञांनी सुचवले आहेत.

  मुंबई, 14 जुलै:  लठ्ठपणा (Obesity) ही बदलत्या जीवनशैलीमुळे समाजाला मिळालेली वाईट देणगी आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्येही ही समस्या आज वाढलेली दिसते. स्थूलता कमी करण्यासाठी (Weight Loss Tips) अनेक उपाय केले जातात. कमी जेवणं, भरपूर व्यायाम करणं अशा पद्धतीनेही वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे वजन कमी होतं; पण ते पुन्हा वाढण्याचा धोका असतो. काही साइड इफेक्ट्सही उद्भवू शकतात. म्हणूनच वजन योग्य प्रकारे कमी कसं करता येईल, याविषयीचे उपाय तज्ज्ञांनी सुचवले आहेत. त्याबाबतची माहिती देणारं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे.

  वजन कमी करण्याबरोबरच कमीत कमी दिवसांत पोटाची चरबी अर्थात बेली फॅट कमी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. वेट लॉस कोच डॉ. स्नेहल म्हणतात, की एका आठवड्यात बेली फॅट कमी होईल का असं अनेक जण सतत विचारत असतात. त्याचं उत्तर देण्यापूर्वी तुमच्या शरीरात चरबी (Fats) किती दिवसांत जमा झाली आहे, जे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अतिरिक्त चरबीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. जितका वेळ चरबी जमा होण्यासाठी लागला, तितकाच तो कमी होण्यासाठी लागू शकतो. एका आठवड्यात किंवा एका महिन्यातही पोटाची चरबी (Belly Fat) कमी करणं शक्य नाही.

  दुधी भोपळ्याचा ज्युस पिण्याचे आहेत अनेक फायदे; कधी आणि किती प्यावा?

  कोणतंही डाएट, व्यायाम, औषधं किंवा मशीन ही गोष्ट साध्य करू शकत नाही. वजन कमी करण्यासाठी घाई करून उपयोग नसतो. त्यासाठी सावकाश विचारपूर्वक पावलं उचलावी लागतात. अनेकदा वजन कमी करण्याच्या घाईगडबडीत अनेक जण चुका करतात. याचा तब्येतीवर दीर्घ काळासाठी परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीनं किंवा पटापट वजन कमी करणं या दोन्ही गोष्टी आरोग्याचं नुकसान करतात. पटापट वजन कमी करण्याच्या उपायांमुळे परिणाम साधला जाईलही; मात्र पुन्हा चरबी वाढू शकते.

  चरबी कमी करण्यासाठी बऱ्याचदा डाएट (Change In Diet) बदलण्याचे प्रयोग केले जातात. काही वेळा तर आहार कमीही केला जातो. एक वेळा जेवणं, पाणी जास्त पिणं असे प्रयोग तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चरबी कमी करताना आहार व्यवस्थित ठेवणं आणि योग्य व्यायाम (Exercise) करणं हे महत्त्वाचं असतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यामुळे वजन हळूहळू कमी होऊन संतुलन साधलं जातं.

  तुमच्या मुलाच्या मनात स्पर्धेची भीती नाही ना? अशी दूर करा मुलांची एन्झायटी

  दीर्घ काळासाठी शरीरात चरबी जमा होणं ही चांगली गोष्ट नाही. चरबी वाढल्यामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढते. तसंच चरबी वाढल्याने शरीर बेढब दिसतं. विशेषतः स्त्रियांच्या सौंदर्याला यामुळे बाधा येते. आपल्या शरीरात काही प्रमाणात चरबी असतेच; मात्र ती अतिरिक्त झाली, तर त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यासाठी घाईने काही करण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss