मराठी बातम्या /बातम्या /heatlh /weight loss tips : केवळ व्यायाम अन् डायटिंग नाही, ही घरकामं करूनही तुम्ही घटवू शकता वजन

weight loss tips : केवळ व्यायाम अन् डायटिंग नाही, ही घरकामं करूनही तुम्ही घटवू शकता वजन

एकत्र कुटुंब हे मोठं कुटुंब असतं. त्यामुळे यात कुटुंबाचे सदस्य जास्त असले तरीही कामं करताना याचा फायदा होतो.

एकत्र कुटुंब हे मोठं कुटुंब असतं. त्यामुळे यात कुटुंबाचे सदस्य जास्त असले तरीही कामं करताना याचा फायदा होतो.

घरकाम करण्याचा हा फायदा तुम्हाला क्वचितच माहीत असेल

मुंबई, 12 जून : वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग, व्यायाम आणि बऱ्याच गोष्टींची मदत घेतात. मात्र यासोबतच घरातली काही कामं करूनही तुम्ही वजन कमी करण्याचा वेग वाढवू शकता. (weight loss)

हो, हे खरं आहे. घरात झाडू-फारशी पुसणं, कपडे धुणं या गोष्टी तुम्ही कराल तर ते नक्कीच उपयोगी ठरेल. यातून वजन कमी करण्यासह पाठदुखी, पाय आणि कंबरदुखी यांपासूनही सुटका मिळू शकते. सोबत वजन नियंत्रणात राहातं. हेल्दी डायट, योगा व्यायामासह घरकामातूनही फिट राहता येतं. जाणून घ्या या कामांबद्दल. (weight loss tips)

फरशी पुसणं

तुम्हाला माहीत आहे का, की फरशी पुसताना तुम्ही जवळपास 145 कॅलरीज बर्न करता. हे ट्रेडमिलवर 15 मिनिट धावण्यासारखं आहे. मात्र तुमचे पाय किंवा पाठीत दुखत असल्यास बसून पुसा. यातून पायांचा व्यायाम होईल. तिथले फॅट कमी होऊन पाय टोन होतील. (weight loss through household works)

कपडे धुणं

वॉशिंग मशीन आल्यानं कपड्यांवरील मळ काढणं आता सोपं झालं आहे. मात्र हातानं कपडे धुताना खूप कॅलरी बर्न केली जाऊ शकते. हे जवळपास 100 बैठका काढण्यासारखं आहे. यातून शरीर हेल्दी राहतं. (cooking and weight loss strategy)

जेवण बनवणं

भाजी कापण्यापासून चपात्या लाटण्यापर्यंत जेवण बनवताना अशी अनेक कामं असतात ज्यात तुम्ही गुंतलेले असता. पूर्ण शरीर यात सहभागी होतं. 1 तासात तुम्ही जवळपास 150 कॅलरी बर्न करू शकता. 15 मिनिट केलेल्या एरोबिक्सइतक्याच कॅलरी यात जळतात. (cleaning home and weight loss)

हेही वाचा 'काही लक्षात राहत नाही, झोप लागत नाही', कोरोना झालेल्या डॉक्टराची आत्महत्या

डस्टिंग करणं

टीव्ही, फ्रिज, टेबलावरची धूळ पुसणं हे काम तुम्ही केलं तर 30 मिनिटात 180 पर्यंत कॅलरीज बर्न होऊ शकतात. हे 15 मिनिट सायकलिंग करण्यासारखं आहे. असं केल्यानं शरीर फिट राहतं.

हेही वाचा बापरे! आकर्षक व्यक्ती दिसताच तिला येतो अटॅक; जमिनीवरच कोसळते तरुणी

अंथरून टाकणं

अंथरून टाकताना 15 मिनिटात 66 कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. हे दीड किलोमीटर पायी चालण्यासारखं आहे. यातून हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. शरीर फिट राहतं.

(Disclaimer - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health Tips, Weight loss, Weight loss tips