नवी दिल्ली, 07 डिसेंबर : आजकाल बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आपल्या आजूबाजूला अनेक लोकांना उदासीनता आणि डिप्रेशनचा त्रास होतो. याची अनेक कारणं असतात. घरातील किंवा ऑफिसमधील ताण हेदेखील याचं एक कारण असू शकतं. मात्र, आजकाल धावपळीचं आयुष्य हे देखील मानसिक ताण वाढण्याचं एक कारण बनलेलं आहे. मानसिक ताणावर काही उपायांनी नियंत्रण करता येतो. मात्र, एक तास लवकर उठून तुम्ही मेंटल स्ट्रेस दूर करू शकता. यासाठी नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. जामा साइकॅट्री जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार. रोज 1 तास लवकर उठल्यास मेंटल स्ट्रेसचा त्रास 23 टक्क्यांनी कमी होतो आणि आपल्याला दिवसभर उत्साही वाटत राहतं.
लवकर उठल्यानं स्ट्रेस कमी
कॉलोराडो बोल्डर युनिवर्सीटी ऑफ एमआयटी इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी 8 लाख 40 हजार लोकांवर एक अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. या संशोधनानुसार ठराविक वेळी झोपणं आणि उठण्याचा मानसिक आरोग्याशी संबंध असतो. झोपेची वेळ निश्चत असेल तर, डिप्रेशनचा त्रास कमी होतो.
या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि वरिष्ठ लेखक सेलिंग बेटर यांच्या मते झोपण्याची वेळ आणि व्यक्तीचा मूड यांचा परस्परांशी संबंध असतो. त्यामुळे 1 तास लवकर उठल्याने किंवा लवकर झोपल्याने मानसिक त्रास कमी होतो.
हे वाचा - किडनी ट्रान्सप्लांट कसं होतं? एका Kidney वर सामान्य आयुष्य जगता येतं?
असा होईल उपयोग
आजकाल लोक रात्री उशिरा झोपतात. रात्री उशिरा झोपल्यामुळे मानसिक त्रास जास्त होतो. मानसिक त्रास होण्याची शक्यता वाढते. जामा साइकॅट्री अहवालामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या लेखानुसार त्यांच्या टीमने DNA परिक्षण करणारी कंपनी आणि बायोमेडिकल डेटाबेस युके बायो बँकच्या डेटावरून अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी मेंडेलियन रॅन्डमायझेशन नावाच्या पद्धतीचा वापर केला आहे. ज्यामुळे लवकर उठण्याचे परिणाम जाणून घेण्यात मदत मिळाली. संशोधकांनी यासाठी 8,50,000 व्यक्तींचा जेनेटिक डेटा आणि 85,000 लोकांचे परिक्षण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Mental health, Stress