स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने मोजा Heart Beats आणि Respiratory Rate; कसं ते पाहा

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने मोजा Heart Beats आणि Respiratory Rate; कसं ते पाहा

Smartphone चा कॅमेरा तुम्ही किती फिट आहात हे तुम्हाला सांगणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी : तुमचं आरोग्य नेमकं कसं आहे हे सांगण्यासाठी स्मार्टवॉचेस आहेेत. शिवाय बरेच स्मार्टफोन अॅपही आहेत. पण आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यानंही तुमचं आरोग्य जाणून घेता येणार आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यानं (Smartphone camera) तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके (Heart Beats) आणि श्वासोच्छ्वासाचा वेग (Respiratory Rate) मोजता येणार आहे. गुगल आपल्या गुगल फिट (Google Fit) या हेल्थ ट्रॅकिंग प्लॅटफॉर्ममध्ये (Health Tracking Platform) आता नवं फीचर (New Feature) सादर करत आहे.

गुगलने या संदर्भातली माहिती नुकतीच आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध केली आहे. हे फीचर सुरुवातीला पिक्सेल (Pixel) फोन्समध्ये गुगल फिट अॅपद्वारे सादर केलं जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात ते अन्य अँड्रॉइड फोन्समध्ये (Android Phones) उपलब्ध केलं जाणार आहे, असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे. गॅजेट्स नाऊने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मोजमाप करण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी होणार, त्याबद्दल गुगलने सविस्तरपणे सांगितलं आहे. युझर्स आपला श्वासोच्छ्वासाचा वेग फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याद्वारे मोजू शकणार आहेत. ते मोजण्यासाठी तुम्हाला  तुमचं डोकं आणि छातीपर्यंतचा भाग फोनच्या सेल्फी कॅमेऱ्यासमोर आणायचा आहे आणि नेहमीच्या पद्धतीने शांतपणे श्वासोच्छ्वास करायचा आहे, असं गुगलनं म्हटलं आहे. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी युझर्सना त्यांचं बोट पाठीमागच्या कॅमेऱ्यावर ठेवायचं आहे. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास मोजणं इतकं सोपं होणार आहे.

हे वाचा -  5G mobile: 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे भारतातले टॉप फोन आणि त्यांची फीचर्स पाहा

हे सगळं शक्य होणार आहे ते शक्तिशाली सेन्सर्स (Sensors) आणि कॉम्प्युटर व्हिजनमधील (Computer Vision) प्रगतीमुळे. अगदी पिक्सेलच्या पातळीवर होणारे बारीकसारीक बदलही या प्रगतीमुळे स्मार्टफोनचा कॅमेरा टिपू शकतो. त्याद्वारे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाचा वेग मोजला जातो. तसंच हृदयाच्या ठोक्यांच्या अनुषंगाने बोटांच्या रंगात होणारा बदलही नोंदवला जाणार आहे.

हे वाचा - आता स्मार्ट चष्माही येणार; खास फीचर्ससह या कंपनीकडून Smart Glasses वर काम सुरू

गुगलने असा दावा केला आहे की, प्रत्यक्ष जगातल्या विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये, विविध व्यक्तींवर ही फीचर्स चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत. मात्र अजून तरी ही  मेजरमेंट्स कोणतंही वैद्यकीय निदान करण्यासाठी किंवा आरोग्याची परिस्थिती कशी आहे याचा निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येणार नाहीत, असंही गुगलने स्पष्ट केलं आहे. त्यासाठी संशोधनाचा आणखी पुढचा टप्पा गाठावा लागणार आहे.

Published by: news18 desk
First published: February 6, 2021, 11:30 AM IST

ताज्या बातम्या