मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बापरे! ब्युटी ट्रिटमेंटचा हा असा कसला भलताच साइड इफेक्ट; 'पाल' बनली महिला

बापरे! ब्युटी ट्रिटमेंटचा हा असा कसला भलताच साइड इफेक्ट; 'पाल' बनली महिला

ब्युटी ट्रिटमेंटनंतर महिलेची त्वचा पालीच्या त्वचेसारखी झाली.

ब्युटी ट्रिटमेंटनंतर महिलेची त्वचा पालीच्या त्वचेसारखी झाली.

महिलेने डबल चिनवर ट्रिटमेंट घेतली तिची ही समस्या दूर झालीच नाही उलट तिची त्वचा पालीसारखी झाली.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 11 ऑगस्ट : सुंदर दिसण्यासाठी किंवा शरीराच्या, त्वचेच्या एका समस्येवर उपाय करण्यासाठी ब्युटी ट्रिटमेंट, कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. पण याचे काही गंभीर दुष्परिणामही होतात. अशाच एका ब्युटी ट्रिटमेंटचा विचित्र साइड इफेक्ट समोर आला आहे. डबल चिनसाठी ब्युटी ट्रिटमेंट घेणाऱी एक महिला चक्क पाल बनली आहे. ब्युटी ट्रिटमेंटचा असा दुष्परिणाम पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. यूकेत राहणारी 59 वर्षांची जेन बोमन. नुकतंच तिने आपलं वजन कमी केलं आहे. त्यानंतर हनुवटी आणि मानेखालील भाग डबल चीनसारखा दिसू लागला. त्यावर तिने सोशल मीडियावर उपाय मागितला. काहींनी तिला ब्युटिशिअनकडे जाण्याचा सल्ला दिला, काहींनी सर्जरी करायला सांगितलं. काही ब्युटिशिन्सनी तिला आपण हे ठिक करू असं सांगून तिला आपल्याकडे बोलावलं. अशाच एता ब्युटिशिअनकडे ती गेली. जिने तिला फ्राइब्लोप्लास्ट प्लाझ्मा ही फेस टाइटनिंग सर्जरी करण्याचा सल्ला दिला. जेनने ही बोटॉक्स प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - खास Festival Tattoo शरीरावर काढण्याआधी हे नक्की वाचा; नाहीतर उद्भवेल मोठा धोका त्यानंतर तिच्या चीनमध्ये फार फरक दिसला नाही. डबल चीन कमी झालीच नाही उलट तिच्या त्वचेवर विचित्र डाग येऊ लागले. तिच्या मानेच्या त्वचेवर लाल रंगाचे पुरळ आले. जे काटे असल्यासारखे दिसत आहे. पालीची त्वचा वाटावी तशी तिची त्वचा झाली आहे. जेन म्हणते माझी मान तशीच लटकत राहिली असती तरी चाललं असतं. डबल चिनमुळे मला काही त्रास नव्हता. पण या अशा त्वचेमुळे माझं आयुष्याची वाट लागली. मला आधीच्या समस्येपासून मुक्ती मिळाली नाहीचर उलट आणखी एक नवीन समस्या आली. यामुळे मलाखूप वेदनाही होत आहेत. हे वाचा - 70 वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म; लग्नानंतर 54 वर्षांनी आईबाबा बनलं वृद्ध दाम्पत्य पहिल्या प्रक्रियेसाठी मी 500 युरो म्हणजे जवळपास 40 हजार रुपये दिले होते. तेव्हा मला जळजळत होत आणि त्वचेत बदल दिसत होता. खूप वेदनादायी होतं. मी ब्युटिशिअनला थांबायला सांगितलं पण ती थांबली नाही आणि आता माझी अशी अवस्था समोर आली. जेनने ब्युटिशिअनविरोधात तक्रारही केली आहे.
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle

पुढील बातम्या