मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Types of Cancer : सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आला तर होऊ शकतो कॅन्सरवर इलाज, कर्करोगाचे प्रकार लक्षात घ्या

Types of Cancer : सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आला तर होऊ शकतो कॅन्सरवर इलाज, कर्करोगाचे प्रकार लक्षात घ्या

types of cancer

types of cancer

सर्वसामान्यपणे कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत; मात्र त्यातले काहीच प्रकार रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतात. कॅन्सर म्हणजे काय, भारतात दिसून येणारे कॅन्सरचे प्रमुख प्रकार कोणते, याविषयी आता सविस्तरपणे जाणून घेऊ या.

पुढे वाचा ...
मुंबई, 28 जुलै : कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हे नाव नुसतं ऐकलं तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. अर्थात त्यामागे कारणही तसंच आहे. कॅन्सर म्हणजे मृत्यू (Death) हे समीकरण जनमानसात रुजल्यानं भीती वाटणं स्वाभाविक आहे; मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की वैद्यकशास्त्रानं कॅन्सर उपचारांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे पहिल्या म्हणजेच अगदी सुरुवातीच्या टप्प्यात (First Stage) कॅन्सरचं निदान झाल्यास योग्य उपचारांनी कॅन्सर नियंत्रणात आणता येतो आणि रुग्णाच्या जीविताचा धोका कमी होतो. सर्वसामान्यपणे कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत; मात्र त्यातले काहीच प्रकार रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतात. कॅन्सर म्हणजे काय, भारतात दिसून येणारे कॅन्सरचे प्रमुख प्रकार कोणते, याविषयी आता सविस्तरपणे जाणून घेऊ या. जगाचा विचार करता कॅन्सर रुग्णांमध्ये चीन (China) आणि अमेरिका (America) हे देश आघाडीवर आहेत. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात दर वर्षी कर्करोगामुळे अंदाजे पाच लाख मृत्यू होतात. कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर हा रोगांचा असा वर्ग, आहे की ज्यामध्ये पेशी अनियंत्रितरीत्या विभाजित होतात. पेशी प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात विभाजित झाल्यानंतर जी रचना तयार होते, त्याला ट्यूमर (Tumour) असं म्हणतात. ट्यूमरचे प्रामुख्यानं दोन प्रकार असतात. कॅन्सरस ट्यूमर (Cancerous Tumor) आणि नॉन-कॅन्सरस अर्थात बेनाइन ट्यूमर (Benign) यांचा या प्रकारांत समावेश होतो. शरीराच्या कोणत्याही भागात निर्माण होणारा प्रत्येक ट्यूमर हा कॅन्सरचाच असतो असं नाही; मात्र ज्या भागात ट्यूमर निर्माण झाला आहे, त्या भागाजवळच्या टिश्यूजचा ट्यूमरमुळे नाश झाला असेल, तर असा ट्यूमर कॅन्सर म्हणून वर्गीकृत होतो. नॉन-कॅन्सरस ट्यूमर ज्या भागात आहे, त्या भागातल्या टिश्यूजवर आक्रमण करत नाही आणि शरीराच्या अन्य भागांतही तो पसरत नाही. हेही वाचा - Blood pressure for children : लहान मुलांनाही असते का ब्लड प्रेशरची समस्या; त्यांच्या बीपीचं प्रमाण काय? कॅन्सरचे सुमारे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. प्रत्येक कॅन्सरवरची उपचार पद्धती, औषधं वेगवेगळी असतात. कॅन्सरची स्टेज, तो शरीराच्या अन्य अवयवांवर पोहोचला आहे की नाही आदी गोष्टींची तपासणी करून डॉक्टर संबंधित कॅन्सर रुग्णावरच्या उपचारांची दिशा ठरवतात. कॅन्सर झालेल्या रुग्णामध्ये विविध प्रकारची लक्षणं दिसून येऊ शकतात. अर्थात कोणत्या प्रकारचा अथवा अवयवाशी संबंधित कॅन्सर आहे, तसंच स्टेज आणि शरीरात कुठपर्यंत कॅन्सर पोहोचला आहे, यावर लक्षणं अवलंबून असतात. त्यामुळे विचित्र किंवा विशिष्ट अशी लक्षणं जाणवताच रुग्णानं तातडीनं वैद्यकीय तपासणी, सल्ला आणि औषधोपचार घेणं आवश्यक आहे. कॅन्सरची स्टेज (Stage) हीदेखील महत्त्वाची बाब असते. ट्यूमरचा आकार, लोकेशन आणि त्याचा विस्तार कसा आहे, यावर कॅन्सरची स्टेज निश्चित होते. असे आहेत कॅन्सरचे प्रमुख प्रकार भारतात प्रामुख्याने ब्रेस्ट अर्थात स्तनांचा कॅन्सर, सर्व्हायकल अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ओरल अर्थात तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने होताना दिसतो. या व्यतिरिक्त ब्लॅडर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, कोलन आणि रेक्टल कॅन्सर, किडनी कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅनेक्रॅटिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, थॉयरायईड कॅन्सर, मेलेनोमा, ब्रेन कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, स्किन कॅन्सर हे अन्य काही प्रकार आहेत. ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) – हा भारतात सर्वसामान्यपणे आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. साधारणपणे 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हा कॅन्सर दिसून येतो. प्राथमिक टप्प्यात मॅमोग्राफी (Mammography), बायोप्सीच्या माध्यमातून याचं निदान केलं जातं. ब्रेस्टचा आकार बदलणं, वेदनारहित गाठ जाणवणं, निपल्समधून रक्त अथवा पस येणं ही ब्रेस्ट कॅन्सरची सामान्य लक्षणं आहेत. आनुवंशिकता, पोषक आहार आणि व्यायामाचा अभाव, गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन, योग्य वयापूर्वी किंवा वयानंतरची गर्भधारणा, मद्यपान आदी गोष्टी ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. हेही वाचा - रोजच्या आयुष्यातील ‘या’ सवयी ठरू शकतात घातक, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध! सर्व्हायकल कॅन्सर (Cervical Cancer) – हा कॅन्सरचा दुसरा प्रकार आहे. सर्व्हायकल कॅन्सरचं सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं तर तो बरा होण्याची शक्यता अधिक असते. सेक्सनंतर, मासिक पाळीनंतर किंवा मेनोपॉजनंतर योनीतून असामान्यपणे रक्तस्राव होणं हे या कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे. सेक्सवेळी तीव्र वेदना होणं, ओटीपोटात दुखणं हीदेखील लक्षणं रुग्णांमध्ये आढळतात. पॅप स्मिअर आणि टिश्यू बायोप्सी या तपासण्यांच्या माध्यमातून या कॅन्सरचं पहिल्या टप्प्यात निदान केलं जातं. तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) – भारतात आढळणारा कॅन्सरचा हा तिसरा सर्वांत सामान्य प्रकार आहे. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आणि मद्यपानामुळे हा कॅन्सर होतो. तोंडातला क्रॉनिक अल्सर, पदार्थ चघळणं अगर गिळण्यास त्रास होणं, दात सैल होणं किंवा पडणं, घशात वेदना आणि आवाजाची लय बदलणं ही या कॅन्सरची लक्षणं आहेत. या कॅन्सरचं निदान अगदी सुरवातीच्या टप्प्यात झाल्यास उपचार लागू पडून रुग्ण आजारातून बाहेर येऊ शकतो. फुफ्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer) – या कॅन्सरचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. यात नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सरचा समावेश होतो. सामान्यतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना या कॅन्सरचा धोका अधिक असतो. परंतु, व्यसन नसलेल्या व्यक्तींनाही हा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसामान्यपणे कॅन्सर रुग्णावर सर्जरी, केमोथेरपी (chemotherapy) आणि रेडिएशन थेरपीच्या मदतीनं उपचार केले जातात. कॅन्सरची स्थिती, रुग्णाची प्रकृती आणि लक्षणं विचारात घेऊन या उपचारांची आखणी केली जाते.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:

Tags: Cancer, Health, Lifestyle

पुढील बातम्या