Home /News /heatlh /

प्रत्यारोपणासाठी हृदयाची प्रतीक्षा संपली; गरजूंच्या शरीरात धडधडणार Total Artifical Heart

प्रत्यारोपणासाठी हृदयाची प्रतीक्षा संपली; गरजूंच्या शरीरात धडधडणार Total Artifical Heart

नैसर्गिक हृदयाप्रमाणेच कार्य करणाऱ्या Total Artifical Heart मुळे रुग्णाला सामान्य जीवन जगता येऊ शकतं.

ब्रिटन, 15 फेब्रुवारी :  हृदयाच्या (heart) काही अशा समस्या, असे आजार ज्यामध्ये दुसरं हृदय बसवण्याची म्हणजे हृदय प्रत्यारोपण (heart transplant) करण्याची गरज असते. अशावेळी ब्रेनडेड रुग्णाच्या शरीरातील हृदय दिलं जातं. पण वेळीच हे हृदय न मिळाल्यानं कित्येकांचा मृत्यू होतो. कित्येक जण आजही हृदयाच्या प्रतीक्षेत आहे. पण त्यांना दाता मिळत नाही आहे. त्यामुळे असे लोक जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत. पण आता अशाच रुग्णांसाठी दिलासादायक बातमी. ती म्हणजे आता अशा हृदयाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण असं हृदय उपलब्ध न झाल्यास त्याला कृत्रिम हृदयाचा (Artifical Heart) पर्याय उपलब्ध झाला आहे. संपूर्ण कृत्रिम हृदय (Total Artifical Heart) विक्री करण्यास युरोपियन युनियनने (European Union) नुकतीच मान्यता दिली आहे. ज्यावेळी डोनर उपलब्ध नाही, पण त्वरित प्रत्यारोपणाची (Transplant) गरज आहे, अशा रुग्णांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. या मंजुरीमुळे कृत्रिम हृदय उत्पादक असलेलं कार्मेट (CARMAT) हे युरोपियन रुग्णालयात थेट कृत्रिम जैविक हृदय डिव्हाईसचा पुरवठा करू शकणार आहे. आयएफएल सायन्सने दिलेल्या माहितीनुसार, कार्मेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेफॅन पियाट यांनी सांगितलं, आम्ही 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत हे डिव्हाईस लाँच करण्यासाठी हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या मुख्य लक्ष्यित ग्राहकांशी चर्चा करू. यामुळे यासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांच्या आजारावर निश्चित तोडगा निघेल. कसं आहे Total Artifical Heart? टीएएच हे संपूर्णपणे कार्यरत असं हृदयाचं उपकरण आहे. ते मुख्यतः अखेरच्या स्टेजमधील हार्ट फेल्युअर (Heart Failure) होण्यापासून रोखतं, तसंच ज्या रुग्णांना 180 दिवसांत प्रत्यारोपण आवश्यक आहे, परंतु डोनर उपलब्ध नसल्यास हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. प्रत्योरापणानंतर वैद्यकीय अधिकारी बाह्य कन्सोलद्वारे या डिव्हाईसचे नियंत्रण करू शकतात. त्यानंतर रुग्ण रुग्णालयातून घरी जाऊ शकतो, आणि या कृत्रिम अवयवासह सामान्य जीवन जगू शकतो. याला दोन व्हेंट्रिकल्स आणि दोन मायक्रोपंप आहेत. जे नैसर्गिक हृदयाप्रमाणेच क्रिया करतात आणि रक्तपुरवठा सुरू ठेवतात. हे डिव्हाईस ऑटोमॅटिक असून त्याची बॅटरी 4 तास चालते. त्यामुळे रुग्णाला आपले दैनंदिन कामकाज सामान्यपणे करता येते. हे वाचा - तीराप्रमाणेच चिमुकल्या अयांशचीही मृत्यूशी झुंज; 16 कोटींचं औषधच वाचवू शकतं जीव टीएएचच्या मागील काही वर्षांपासून क्लिनिकल टेस्टस (Clinical Tests) सुरू होत्या. त्या अनुषंगाने मे 2020 मध्ये त्याचे प्रथम प्रत्यारोपण अपेक्षित होतं. यातील मुख्य चाचणी ज्यातील एका फेजमध्ये 3 चाचण्या असतात, ती फेज अजूनही सुरू असून डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होईल. मात्र यापूर्वी केलेल्या चाचण्यांनुसार टीएएच अत्यंत सुरक्षित असून, याचे रुग्णांवर फारच कमी प्रमाणात साईड इफेक्टस पाहायला मिळाले आहेत. परंतु त्यातही सॅम्पलस मात्र मर्यादित होते. हेमोकाम्पिटॅबिलीटी, ऑटोरेग्युलेशन आणि सायलेंट ऑपरेशन्समुळे कार्मेट टीएएच डिव्हाईस हे हार्ट फेल्युअरच्या लास्ट स्टेजला असलेल्या रुग्णांसाठी एक पर्यायी उपचार ठरू शकतो, असं अभ्यास पथकातील प्रमुख संशोधक फिन गुस्ताफसन यांनी सांगितलं. जगभरात सुमारे 26 दशलक्ष लोक हे हार्ट फेल्युअरमुळे त्रस्त आहेत. त्यात व्यापक यांत्रिक हृदयाचे परिणाम खूप मोठे आहेत. यामुळे डोनर्सची नितांत गरज असून, प्रत्यारोपणासाठी हृदयाचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने अशा शस्त्रक्रियांची संख्या खूपच कमी असून, ती प्रतिवर्ष 5400 पर्यंत मर्यादित आहे. हे वाचा - मोदी सरकारला कोरोना लशीचा 'ताप'; दुसरा डोस सुरू करताच समोर आली धक्कादायक माहिती या आर्टिफियशल हार्टच्या पुरवठ्यामुळे ही कमतरता दूर होईल. तसंच टप्प्याटप्प्याने हार्ट फेल्युअरने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे जीवनामान सुधारण्यास मदत होईल, तसंच प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना देखील फायदा होईल.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Heart Attack

पुढील बातम्या