Home /News /heatlh /

कोरोनानंतर विविध आजारांनी डोकं वर काढलंय का? अशा पद्धतीनं काळजी घेऊन रहा निरोगी

कोरोनानंतर विविध आजारांनी डोकं वर काढलंय का? अशा पद्धतीनं काळजी घेऊन रहा निरोगी

कोविडमधून बरे झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात फायब्रोमायल्जियावर उपचार घेत आहेत. हे लोक स्नायू, अस्थिबंधन आणि हाडांच्या वेदनांनी त्रस्त आहेत. अनेकदा त्यांच्यामध्ये थकवा येतो आणि पोटाच्या समस्याही कायम राहतात.

    Tips For Painful Health Manages : कोरोनाची लागण (Corona Infection) झालेल्या लोकांना वर्षभरानंतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉक्टर देखील आश्चर्यचकित आहेत की, इतक्या दिवसानंतरही संक्रमित व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे कमी होत नाहीत. उलट इतर अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्यामध्ये दिसू लागल्या आहेत. कोविडनंतरच्या रुग्णांमध्ये थकवा, सांधेदुखी, झोपेमध्ये अडचण, स्मृतीभ्रंश यासारख्या अनेक समस्या समोर येत आहेत. शास्त्रज्ञांनी या सर्व समस्यांना फायब्रोमायल्जिया  (fibromyalgia)  असे नाव दिले आहे. फायब्रोमायल्जिया ही एक जुनाट स्थिती बनली आहे, जी कोरोनामुळे संक्रमित झालेल्या लोकांमध्ये उद्भवते. एचटीच्या बातमीनुसार, कोविडमधून बरे झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात फायब्रोमायल्जियावर उपचार घेत आहेत. हे लोक स्नायू, अस्थिबंधन आणि हाडांच्या वेदनांनी त्रस्त आहेत. अनेकदा त्यांच्यामध्ये थकवा येतो आणि पोटाच्या समस्याही कायम राहतात. या सगळ्यामुळे, रुग्ण उदासीनता, चिंता आणि अस्वस्थ जीवन जगू लागतो. विषाणूमुळे रक्तवाहिन्या खराब झाल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की उपचार करणे देखील सोपे नाही, कारण आतापर्यंत त्यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. डॉक्टरांनी असेही सांगितले की, कोविड संसर्गानंतर अशा समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. जे लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत किंवा ऑक्सिजन थेरपी घेत आहेत किंवा ICU मध्ये दाखल होणार आहेत, त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक गंभीर बनू शकते. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट गुडगाव येथील पल्मोनोलॉजी विभागाचे संचालक डॉ. मनोज गोयल म्हणाले की, फायब्रोमायल्जिया आता पूर्णपणे समजला आहे. हा मस्कुलोस्केलेटल सिंड्रोम (musculoskeletal syndrome) आहे. कोविड संसर्गामुळे, विषाणूने रक्तवाहिन्या खराब केल्या आहेत, ज्यामुळे हे सर्व घडत आहे. तथापि, ते म्हणाले की फायब्रोमायल्जिया हा जीवघेणा आजार नाही. जीवनशैलीत बदल करून त्यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. हे वाचा - World Rose Day 2021:कॅन्सरच्या रुग्णांसाठी रोज डे आहे खास; जाणून घ्या कारण या समस्या टाळण्याचे काही मार्ग दररोज ध्यान करा. असे ध्यान करा ज्यात तुम्ही दीर्घकाळ श्वास आत आणि बाहेर काढू शकता. स्नायू आणि पोटासाठी नियमित व्यायाम करा. शरीराला शक्य तितके सक्रिय ठेवा. चाला, सायकल चालवा, बाईकवर फिरायला जा आणि एरोबिक व्यायाम करा. दारू आणि सिगारेटला पूर्णपणे अलविदा म्हणा. हे वाचा - Sanjay Raut vs Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार – संजय राऊत जंक फूड आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका. चांगली झोप घ्या लवकर झोपा, लवकर उठा. कोमट पाण्याने आंघोळ करा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या