नवी दिल्ली, 01 एप्रिल : वजन कमी करणं सोपं काम नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. निरोगी आहार आणि नियमित व्यायामानं आपण वजन कमी करू शकतो. त्याचबरोबर आयुर्वेदात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. यापैकी एक म्हणजे मेथी. मेथीच्या पिवळ्या लहान बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि ते चरबी कमी (Belly Fat Loss Tips) करण्यास मदत करतात. शारीरिक समस्या दूर करण्यासाठी मेथीचा वापर केला जातो. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी मेथी कशी उपयोगी आहे?
आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी 'झी न्यूज'ला दिलेल्या माहितीनुसार, पोटाची चरबी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेथी तुम्हाला चांगली उपयोगी ठरू शकते. मेथीच्या दाण्यांमध्ये अघुलनशील फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. मेथी दाणे पचनासाठी चांगले असतात आणि शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर टाकते. याशिवाय, ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि सूज नियंत्रित करते. यातील पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे मेथीचे नियमित सेवन करणे फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे मेथीचे सेवन करा
1. अंकुरलेले मेथीचे दाणे
वजन कमी करण्यासाठी स्नॅक म्हणून अंकुरलेल्या मेथीचे सेवन करणे चांगले. संशोधनानुसार, अंकुरलेल्या मेथीच्या दाण्यांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण वाढते आणि ते सहज पचतात. यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. चांगल्या परिणामांसाठी, सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
हे वाचा - सकाळी नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य-शांततेसाठी असं ठरतं फायदेशीर
2. मेथी दाणे आणि मध
जलद वजन कमी करायचे असेल तर मेथीसोबत मधाचे सेवन करा. मध हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा घटक मानला जातो आणि शरीरातील सूजही कमी करतो. मधामध्ये कॅलरी कमी असते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि रिकाम्या पोटी खा.
हे वाचा - डायपर वापरताना अनेकजण या चुका करतात, त्याचा बाळाला त्रास सहन करावा लागतो
3. रिकाम्या पोटी मेथीचे पाणी
सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे जलद वजन कमी होते. त्याचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे ते खाल्ल्याने किंवा त्याचे पाणी पिल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips