मराठी बातम्या /बातम्या /heatlh /टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी खास डाएट प्लॅन, 15 किलोपर्यंत कमी होईल वजन

टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी खास डाएट प्लॅन, 15 किलोपर्यंत कमी होईल वजन

टाइप 2 डायबेटिस असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणं अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती चांगली होऊ शकते.

टाइप 2 डायबेटिस असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणं अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती चांगली होऊ शकते.

टाइप 2 डायबेटिस असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणं अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती चांगली होऊ शकते.

    नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : डायबेटिस (Diabetes) म्हणजे मधुमेहामुळे व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण (Blood sugar level) नियंत्रणात राहत नाही. सध्या आपल्या देशामध्ये डायबेटिस रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. साधारण दहा व्यक्तींपैकी तीन ते चार लोकांना मधुमेह असल्याची माहिती समोर आलेली आहे. हा आजार असलेल्या लोकांमध्ये भूक लागण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं त्यांना वजनवाढीच्या (weight gain) समस्यांचाही सामना करावा लागतो. अशा लोकांसाठी संशोधकांनी आता एक उपाय शोधून काढला आहे. टाइप 2 डायबेटिस (Type 2 diabetes) असलेल्या लोकांना वजन कमी (Weight loss) करण्यासाठी उपयुक्त ठरणारं डाएट (Diet) तज्ज्ञांनी तयार केलं आहे. या डाएटमुळे रुग्णांचं वजन तर कमी होईलच शिवाय त्यांचं आरोग्यही सुधारण्यास मदत होईल. विशेष म्हणजे या डाएटमध्ये डायबेटिसला रिव्हर्स करण्याची क्षमता आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    स्कॉटलंडमधील ग्लासगो युनिव्हर्सिटीतील (University of Glasgow) संशोधकांच्या नेतृत्त्वात डायबेटिस रुग्णांच्या आहाराबाबत एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा अहवाल डायबेटॉलॉजिया मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनादरम्यान संशोधकांनी लोकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांची तुलना करण्यासाठी सुमारे 10 ते 12 जुन्या संशोधनांचादेखील आढावा घेतला. विशेषत: अशा खाद्यपदार्थांचा अभ्यास करण्यात आला जे मधुमेहींना वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यातूनच टाइप 2 डायबेटिस रुग्णांसाठी एक डाएट प्लॅन तयार करण्यात आला आहे.

    डायबेटिस असलेल्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल तर लो कॅलरी (Low calorie), लो कार्ब, हाय व्हेजिटेरियन प्रोटिन, हाय गुड फॅट असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. डायबेटिस असलेल्या रुग्णांनी दररोज आहारामध्ये 500 ते 1 हजार 500 पेक्षा जास्त कॅलरीज घेऊ नयेत, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. याशिवाय तुम्ही आपल्या आहारात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या शेक आणि सूपचा समावेश करू शकता. तज्ज्ञांच्या मते, 12 आठवडे कमी कॅलरी असलेला आहार घेतल्यास डायबेटिस रुग्ण प्रभावीपणे वजन कमी करू शकतात. 12 आठवडे दिवसातून फक्त 800 कॅलरीजचा समावेश असलेलं लिक्विड फूड (Liquid food) खाल्ल्यास टाइप 2 डायबेटिस असलेला रुग्ण किमीत कमी 15 किलो वजन घटवू शकतो.

    टाइप 2 डायबेटिस असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणं अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती चांगली होऊ शकते. तसेच, डायबेटिसमुळे उद्भवणाऱ्या इतर समस्यांपासूनही बचाव होऊ शकतो, असं संशोधनात सांगण्यात आलं आहे. अनेकांना लठ्ठपणामुळे टाइप 2 डायबेटिस होतो. त्यामुळे जर तुम्ही 15 किलो वजन कमी केलं तर टाइप 2 डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो. शिवाय आपल्या शरीरातील इन्सुलिनला (Insulin) चांगलं काम करण्यासही मदत होते, असंही संशोधनात स्पष्ट झालं आहे.

    टाइप 2 डायबेटिस असूनही वजन कमी केल्यास तुम्हाला अधिक उत्साही वाटेल, झोप चांगली लागेल. तुम्ही जास्त अॅक्टिव्ह व्हाल आणि तुमचा मूडही चांगला राहिल. एकूणच काय तर डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराची काळजी घेतली तर त्यांचा त्रास कमी होऊ शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Diabetes, Tips for diabetes