मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोना लॉकडाऊनमध्ये हजारो नवजात चिमुकल्यांचा गेला जीव; मुंबईतील आकडेवारी धक्कादायक

कोरोना लॉकडाऊनमध्ये हजारो नवजात चिमुकल्यांचा गेला जीव; मुंबईतील आकडेवारी धक्कादायक

कोरोना लॉकडाऊनदरम्यान नवजात चिमुकल्यांच्या झालेल्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोना लॉकडाऊनदरम्यान नवजात चिमुकल्यांच्या झालेल्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोना लॉकडाऊनदरम्यान नवजात चिमुकल्यांच्या झालेल्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

    मुंबई, 17 फेब्रुवारी : कोरोना लॉकडाऊनचा (corona lockdown) फटका तसा अनेकांना बसला आहे. कुणाची नोकरी गेली, कुणाला घरात राहून आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत, कुणी शारीरिक तर कुणी मानसिक आजारांशी लढा देत आहे. पण या लॉकडाऊनचा आता आता असा परिणाम समोर आला आहे, जो ऐकून धक्काच बसेल. कोरोना लॉकडाऊनमध्ये हजारो नवजात चिमुकल्यांचा जीव (infants died) गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या वर्षी सरकारनं कोरोना लॉकडाऊन लागू केला होता. या दरम्यान महाराष्ट्रात किती नवजात बालकांचा मृत्यू (infants died in maharashtra) झाला याची आकडेवारी समर्थन या संस्थेनं (NGO) RTI अंतर्गत मिळवली. फेब्रुवारी ते डिसेंबर  2020 दरम्यान राज्यात तब्बल12,179 नवजात बालकांचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती मिळाली. चिंताजनक म्हणजे मुंबईसारख्या शहरातील आकडेवारी सर्वात जास्त आहे. मुंबई, अकोला, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि पुण्यात 4,411 मृत्यू झाले आहे.  जे प्रमाण एकूण मृत्यूच्या 36.22% आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1,097 मृत्यू झाले आहे.  त्यानंतर अकोला 783, औरंगाबाद 729, नाशिक 664, नागपुर 587 आणि पुण्यात 551 मुलांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - क्रिकेटच्या मैदानातून धक्कादायक बातमी, फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू समर्थन ही संस्था मानव अधिकार आणि कुपोषणाबाबत काम करते. द हिंदूच्या वृत्तानुसार या संस्थेचे समन्वयक रूपेश कीर यांनी सांगितलं, आम्हाला मिळालेली ही आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्रात 2020 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एक ते पाच वर्षे वयाच्या मुलांच्या मृत्यूची संख्या 1,872 आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी ते डिसेंबर देशात लॉकडाऊन होता. ग्रामीण आणि आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येबाबत माहिती आहे. पण या आकडेवारीनंतर आता मुंबईसारख्या शहरातही काम करण्याची गरज असल्याचं स्पष्ट होतं. हे वाचा - दुबईची राजकुमारी व्हिलामध्ये कैद; व्हिडीओ प्रसारित करून केली मदतीची याचना या संस्थेनं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनादेकील पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूची आकडेवारी आणि कारणं दिली आहेत. यामध्ये वेळेआधी बाळाचा जन्म, कुपोषित आई आणि बाळ, संक्रमण, न्युमोनिया, श्वास घ्यायला त्रास अशा समस्यांचा समावेश आहे. शहरी क्षेत्रातील मृत्यूची अधिक संख्या हा चिंतेजा विषय आहे आणि यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची गरज असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Baby died, Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या