मुंबई 17 जुलै : आपल्या खाण्या-पिण्यात झालेल्या थोड्याशा बदलाचाही परिणाम हा आपल्या शरीराच्या आरोग्यावर (Body Health) होत असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे काहीजणांच्या खाण्या-पिण्याच्या वेळाही बदललेल्या आहेत परिणामी अशांना ॲसिडिटीची (Acidity) समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते.
आपल्या जठरामध्ये असलेली आम्ल आपली पचनप्रक्रिया सुरळित करण्यास मदत करतात. पण आम्लाचं प्रमाण वाढल्यास आपल्याला ॲसिडिटीची समस्या उद्भवते, त्यामुळे आपल्या छातीत जळजळ होते, करपट ढेकर येतात किंवा पोटात दुखते. या त्रासाला कंटाळून आपण त्यावर इंस्टंट उपाय (Instant solutions) करण्यासाठी गोळ्या-औषधांचा आधार घेतो, ज्यामुळे आपल्याला तात्पुरता आराम तर मिळतो पण याचे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट्सही (Side Effects) होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला सततचा ॲसिडिटीचा त्रास असेल तर खालील काही घरगुती उपाय (Home remedies) तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
गुळाच्या सेवनाने मिळेल आराम
गूळ (Jaggery) हा पचनासंबंधी समस्यांसाठी उपयुक्त मानला जातो. जेवण झाल्यावर गूळ खाल्ल्याने अपचनाच्या म्हणजेच ॲसिडिटीची समस्या भेडसावत नाही. यामध्ये विपुल प्रमाणत प्रोटीन (Protein), व्हिटॅमिन (Vitamin), मिनरल (Mineral), लोह (Iron), पोटॅशियम (Potassium) आणि कॉपर (Copper) असतं ज्याचा उपयोग ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी होतो. गूळ आपल्या पोटामध्ये म्यूकस (Mucus) उत्पादित करतो. म्यूकस म्हणजे आपल्या शरीरात असलेला लाळेसारखा पातळ थर जो आपल्या पोटाच्या बाहेरील व आतील थराचे पेप्सिन (Pepsin) आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या (hydrochloric Acid) प्रभावांपासून संरक्षण करतो.
ये केला टेढा क्यों है भाई! केळी सरळ नाही वाकडीच का असतात माहिती आहे का?
दालचिनी चहा उपयुक्त
काहीजणांना चहा प्यायल्याने ॲसिडिटीची समस्या उद्भवते. पण जर तुम्ही दालचिनी चहा पिण्यास सुरुवात केली तर ॲसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत होईल. दालचिनी चहा पोटाच्या आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त मानला जातो. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात दालचिनी चहा उकळवायचा आहे, त्यात गोडीसाठी तुम्ही गुळही टाकू शकता. हा चहा प्यायल्याने तुमची ॲसिडिटी दूर होईल.
अजबच! चीनने अंतराळात पेरले तांदूळ, स्वर्गातला भात म्हणून सोशल मीडियावर PHOTO
ओव्याचा वापर फायदेशीर
ओवा खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. यामुळे तुम्हाला छातीतली जळजळ, करपट ढेकर, पोटदुखी, गॅस यासारख्या त्रासांपासून आराम मिळेल. तुम्ही एक चमचा ओवा बारीक करून त्याचं सेवन करू शकता किंवा गरम पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता, ज्यामध्ये ओव्याचा पूर्ण अर्क उतरेल. यामुळे तुमच्या ॲसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips