चेन्नई, 11 ऑगस्ट : एका रुग्णावर किडनी ट्रान्सप्लँटची (kidney transplant) तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया (third surgery) करून त्याच्या शरीरात पाचवी किडनी (Fifth kidney) बसवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. चेन्नईच्या (Chennai) 41 वर्षीय रुग्णाच्या शरीरात अगोदरच 4 किडन्या असताना डॉक्टरांनी पाचवी किडनी बसवण्याचं अत्यंत आव्हानात्मक ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं.
गुंतागुंतीची मेडिकल हिस्ट्री
हा रुग्ण केवळ 14 वर्षांचा असताना त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. त्यानंतर त्याला नवी किडनी बसवण्यात आली होती. या किडनीनं पुढची 9 वर्षं त्याच्या शरीराची साथ दिली आणि ती निकामी झाली. त्यानंतर 2005 साली त्याचं दुसरं किडनी ट्रान्सप्लँट करण्यात आलं आणि त्याच्या शरीरात चौथी किडनी बसवण्यात आली. ही किडनी पुढची 12 वर्ष कार्यरत राहिली. त्यानंतर मात्र या रुग्णाला डायलिसिसशिवाय इतर कुठलाही पर्याय राहिला नाही.
हायपरटेन्शन आणि हार्ट सर्जरी
पहिल्या दोन किडन्या दीर्घकाळ न टिकण्यामागे हायपरटेन्शन हे कारण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याचप्रमाणं त्याच्या हृदयात ब्लॉक असल्यामुळे ते काढून टाकण्यासाठी रुग्णाची बायपास सर्जरी करण्यात आली. त्यामुळे आता आणखी एक ट्रान्सप्लँट केल्यास त्याचे शरीर साथ देईल, असा डॉक्टरांचा कयास होता.
आव्हानात्मक सर्जरी
रुग्णाच्या शरीरात अगोदरच 4 किडन्या असल्यामुळे पाचवी किडनी बसवण्यासाठी जागा मिळणे, हे मोठं आव्हान होतं. शिवाय नव्या किडनीला शरीरातील रक्तप्रवाहाशी जोडून देण्याचंही बिकट आव्हान हे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांसमोर होतं. महत्त्वाचं म्हणजे निकामी झालेल्या जुन्या किडन्या शक्यतो काढून टाकल्या जात नसल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील पूर्ण रक्त बदलावं लागू शकतं. शिवाय शरीरातील अँटिबॉडिजमुळे नवं रक्त शरीराला सूट होईल, याची खात्री नसते. त्यामुळे तो धोका नाजूक प्रकृतीच्या रुग्णांबाबत स्विकारला जात नाही.
हे वाचा - उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याचा घेतला बदला; लेकानं जन्मदात्याचा केला खेळ खल्लास
यशस्वी ऑपरेशन
पाचवी किडनी जोडण्याचं बिकट ऑपरेशन डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडलं. आता रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत असून रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Health, Kidney sell