मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Thin Hair : केस जास्त पातळ असल्यास `या` गोष्टींची घ्या सर्वाधिक काळजी

Thin Hair : केस जास्त पातळ असल्यास `या` गोष्टींची घ्या सर्वाधिक काळजी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पातळ केसांची योग्य पद्धतीनं निगा राखली आणि केसांसाठी काही विशिष्ट गोष्टींचा वापर टाळला तर तुमच्या अनेक समस्या टळतील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 सप्टेंबर :   केस दाट, मुलायम व्हावेत यासाठी पुरुष आणि महिला बाजारात उपलब्ध असलेली विविध प्रकारची उत्पादनं वापरतात. यात शाम्पू, कंडिशनर तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या जेल बेस्ड उत्पादनांचा समावेश असतो. खरं तर प्रदूषण, धूळ, मातीमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसंच काही शारीरिक समस्यांमुळेदेखील केसांचं आरोग्य चांगलं राहत नाही. त्यामुळे केस पातळ होण्याची समस्या उद्भवते. केस पातळ झाल्याने त्यांचं सेटिंग नीट राहत नाही. तसंच स्कॅल्प अर्थात केसांखालील डोक्याची त्वचा दिसू लागते. या समस्येमुळे महिलांना सार्वजनिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.

पातळ केसांची योग्य पद्धतीनं निगा राखली आणि केसांसाठी काही विशिष्ट गोष्टींचा वापर टाळला तर केस पातळ होणार नाहीत आणि केसांचं आरोग्यदेखील सुधारेल. `एनडी टीव्ही इंडिया`ने या विषयीची माहिती दिली आहे.

कोणती खबरदारी आवश्यक?

प्रदूषण, धूळ, मातीसारखी बाह्य कारणं तसंच हॉर्मोनल चेंजेस किंवा जीवनशैलीतील बदलांमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आज अनेक महिला आणि पुरुषांना केस पातळ होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. केस पातळ झाल्याने ते व्यवस्थित सेट होत नाहीत, तसंच केसांखालील त्वचेवरही याचा परिणाम होतो. केस पातळ होऊ नयेत, यासाठी काही गोष्टींचा वापर टाळला पाहिजे. तसंच जास्त प्रमाणात रसायनं असलेली उत्पादनं वापरणं टाळलं पाहिजे. रसायनांचं प्रमाण जास्त असलेल्या उत्पादनांचा वापर केला तर केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय तुमच्या केसांसाठी योग्य ठरतील अशाच उत्पादनांची निवड करणंदेखील गरजेचं आहे. केस तेलकट आहेत, की कोरडे हे जाणून घेत त्यानुसार उत्पादनांची निवड करावी.

नारळ पाणी सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं, अशा लोकांनी पिताना काळजी घ्या

केस लवकर पातळ होऊ नयेत, यासाठी केस शाम्पूने धुतल्यानंतर लगेच कंडिशनरचा वापर करण्याऐवजी केस तसंच काही वेळ ठेवा. शाम्पू केल्यानंतर कंडिशनरचा वापर केला तर तुमचे केस जास्त पातळ दिसतील. शाम्पू केल्यानंतर केस मोकळे राहू द्या. यामुळे केस दाट आणि सुंदर दिसतील.

ज्या महिलांचे केस पातळ आहेत, त्यांनी केस स्ट्रेट करणं टाळावं. स्ट्रेट केस अजून पातळ दिसतात. त्याऐवजी केस कुरळे किंवा जसे आहेत तसेच ठेवा. त्यामुळे केसांचा फुगवटा दिसेल त्यामुळे ते दाट असल्याचं समोरच्याला भासेल. केस पातळ असतील तर जेल बेस्ड स्प्रेचा वापर करू नका. जेल किंवा तेलाचा वापर करून केसांची स्टाईल केली तर ते अजून पातळ दिसतील. यामुळे केसांचं राहिलेलं सौंदर्यही निघून जाईल. यामुळे केस कमी झाल्याचं स्पष्टपणं जाणवतं. त्यामुळे जेल बेस्ड उत्पादनांचा वापर टाळावा.

कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार जन्मजात देखील असू शकतो, या लक्षणांवरून वेळीच ओळखा

तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त पातळ असतील तर स्टाईल करण्यासाठी किंवा केस सेट करण्यासाठी रोज हिटिंग टूल्सचा वापर करू नका. हिटिंग टूल्समुळे तुमचे केस जास्त कोरडे होतात आणि यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

First published:

Tags: Health Tips, Woman hair