मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Healthy kids : ऋतु कोणताही असो, निरोगी आरोग्यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टी हव्याच

Healthy kids : ऋतु कोणताही असो, निरोगी आरोग्यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टी हव्याच

अनेक पालकांना मुलांना सकस आहार देण्याबाबत माहिती नसते आणि ते त्यांना काहीही खायला घालतात, ज्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. चांगल्या वाढीसाठी निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहार जाणून घेऊया.

अनेक पालकांना मुलांना सकस आहार देण्याबाबत माहिती नसते आणि ते त्यांना काहीही खायला घालतात, ज्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. चांगल्या वाढीसाठी निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहार जाणून घेऊया.

अनेक पालकांना मुलांना सकस आहार देण्याबाबत माहिती नसते आणि ते त्यांना काहीही खायला घालतात, ज्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. चांगल्या वाढीसाठी निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहार जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : लहान मुलांना सकस आहार खायला घालणे, हे एक आव्हान आहे. मुलांचा आहार फक्त आरोग्यदायी नव्हे तर चविष्टही असावा, याचीही काळजी घ्यावी लागते. त्यांना एखादा पदार्थ आवडत नसेल तर ते त्याकडे बघायलाही तयार होत नाहीत. मुलांचा आहार हेल्दी आणि चवदार बनविण्याचा मेळ बसवताना पालकांना चांगली कसरत करावी लागते. काही हेल्दी पदार्थ खायला मुलं तयार होत नाहीत. अनेक वेळा असं घडतं की, पालकांना मुलांना सकस आहार देण्याबाबत माहिती नसते आणि ते त्यांना काहीही खायला घालतात, ज्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. मुलांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. काय आहेत या गोष्टी, जाणून घेऊया. मुलांसाठी हेल्दी फूड - मॉम जंक्शनच्या माहितीनुसार, धान्यांमध्ये भरपूर फायबर असतात. तृणधान्यांमधून अनेक आवश्यक पोषक घटक मुलांच्या शरीरात जातात. मुलांच्या आहारात दलिया, बार्ली, गहू आणि शक्य असल्यास ब्राउन राइस यांचा समावेश करा. जेणेकरून त्यांचा आहार आरोग्यदायी बनू शकेल. भाज्या खायला घालण्याची सवय लावा - मूल तृणधान्ये खायला लागल्यापासून त्याच्या आहारात फायबर आणि पोषक तत्वांनी युक्त भाज्यांचा समावेश करणे सुरू करा. पालक, बीन्स, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या मुलांना खायला द्या. या भाज्या प्युरी स्वरुपात तयार करून द्याव्यात, जेणेकरून मुलांना ते सहज पचता येईल. तेल-तिकट जास्त नसावे. फळे महत्त्वाची - फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. मुलांच्या आहारात दररोज किमान एका फळाचा समावेश करा. फळांमध्ये, त्यांना केळी, टरबूज आणि सफरचंद यासह द्राक्षे खायला द्या. यामुळ तुमचे मुल निरोगी राहु शकेल. हे वाचा - बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा कडधान्ये आणि शेंगा खायला द्या - कडधान्ये आणि शेंगा लोह, पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत असतात. या गोष्टी मुलांना आहारात देणे गरजेचे आहे. चणे, राजमा, वाटाणे, छोले मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध शेंगांचा फायदा होतो. सुका मेवा (ड्रायफ्रुट्स) फायदेशीर - आहार हेल्दी बनवण्यासाठी मुलांना विविध धान्यांची प्युरी दिली जाऊ शकते. आहारात सुक्या मेव्यांचा समावेश हवा. मात्र, ते नीट पचेल अशा स्वरुपात देणे गरजेचे आहे. खजूर आणि अंजीर मुलांना सर्वात जास्त फायदा देतात. हे वाचा - तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश निरोगी बनवण्यासाठी या 5 प्रकारच्या गोष्टींचा आहाराचा समावेश केल्यास बालकाचा योग्य विकास होईल आणि तो आजारीही कमी राहील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या