Home /News /heatlh /

Control Belly Fat : वाढलेल्या पोटाविषयी अशा चुका टाळा; या सोप्या 4 पद्धती वापरून बघा परिणाम

Control Belly Fat : वाढलेल्या पोटाविषयी अशा चुका टाळा; या सोप्या 4 पद्धती वापरून बघा परिणाम

काही लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी कमी खातात. असे केल्याने वजन कमी होते पण पोटाची चरबी कमी होत नाही. या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना पोटाची चरबी कशी कमी करावी, याविषयी नेमके माहीत नाही.

    मुंबई, 06 ऑगस्ट : आपण असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांचे वजन जास्त नाही, पण पोटावर खूप चरबी असते. ही चरबी अनेक रोगांचे कारण बनते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक चुकीच्या मार्गांचा अवलंब करून आणखी समस्या निर्माण करतात. काही लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी कमी खातात. असे केल्याने वजन कमी होते पण पोटाची चरबी कमी होत नाही. या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना पोटाची चरबी कशी कमी करावी याविषयी नेमके माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला 4 सोपे उपाय सांगत आहोत, जे या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी ठरू (How to Control Belly Fat) शकतात. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा - वेबएमडीच्या अहवालानुसार, दररोज 30 मिनिटे मध्यम व्यायाम किंवा वेगात चालल्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. त्याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत होतात आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. प्रत्येकाने आपल्या दिनक्रमात व्यायामाचा समावेश करावा. फायबरयुक्त आहार घ्या - वजन कमी करण्यासाठी लोकांना आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा आपण आहारात बदल करतो आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करतो तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या पोटावर दिसून येतो. आहारात उच्च फायबर पदार्थ आणि फळांचा समावेश करू शकता. एका संशोधनात असे समोर आले आहे की, दररोज 10 ग्रॅम फायबरचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होते. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा दररोज 6-7 तासांची झोप आवश्यक - आत्तापर्यंतच्या अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, जे लोक दररोज 6-7 तास किंवा त्याहून अधिक झोप घेतात, त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी असतो. याशिवाय जे लोक दररोज फक्त 3-4 तास झोपतात, त्यांना लठ्ठपणाचा धोका अनेक पटींनी असतो. जर तुम्ही योग्य झोप घेत असाल आणि रात्री उशिरापर्यंत जागरण न केल्यास तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर तणाव नियंत्रणात ठेवा - आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेक लोक तणावाखाली राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तणावामुळे लोकांमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि अनेक मानसिक समस्याही उद्भवतात. तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलल्यास पोटाची चरबीही कमी होईल. यासाठी आपण दररोज ध्यान करू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Weight, Weight loss

    पुढील बातम्या