मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

चमचमीत खाल्ल्यानंतर जरूर करा 'हे' उपाय; तेलकट, मसालेदार पदार्थांचाही होणार नाही त्रास

चमचमीत खाल्ल्यानंतर जरूर करा 'हे' उपाय; तेलकट, मसालेदार पदार्थांचाही होणार नाही त्रास

तेलकट अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्यादेखील वाढू शकतात. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शरीर सुस्त आणि थकल्यासारखे वाटते, ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होते.

तेलकट अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्यादेखील वाढू शकतात. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शरीर सुस्त आणि थकल्यासारखे वाटते, ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होते.

तेलकट अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्यादेखील वाढू शकतात. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शरीर सुस्त आणि थकल्यासारखे वाटते, ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 29 सप्टेंबर : फ्रेंच फ्राईज, फ्रिटर्स आणि फ्राईड चिकन असे पदार्थ पाहिल्यानंतर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि ते खाण्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही फूड टेस्टमध्ये ते जितके चांगले तितकेच ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. त्यामध्ये सोडियम, सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी, उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्यास मदत होते.

तेलकट अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्यादेखील वाढू शकतात. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शरीर सुस्त आणि थकल्यासारखे वाटते, ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होते. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर अतिरिक्त कॅलरीज कमी करणे तसेच तेलामुळे होणारे नुकसान नियंत्रित करणे आवश्यक आहे. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शरीर कसे डिटॉक्स करावे ते जाणून घेऊया.

गरम पाणी

तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. यासाठी पाणी हा एक चांगला मार्ग असू शकतो. Harzindagi.com नुसार, दिवसातून किमान 8 ते 9 ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यावे, त्यामुळे घसा आणि पोटात साचलेला स्निग्ध पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

नवरात्रीचा उपवास केलाय? या गोष्टींचा आहारात करा समावेश, नाही वाटणार अशक्तपणा

लिंबूपाणी

दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करा. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबू सिरप प्यावे. लिंबू मिसळलेले गरम पाणी शरीराला खूप लवकर आणि खोलवर डिटॉक्स करते.

पोटाला विश्रांती द्या

जास्त तळलेले आणि स्निग्ध पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया नीट होत नाही. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराच्या अंतर्गत भागाला थोडी विश्रांती देण्यासाठी काही दिवस जड अन्न टाळावे. हलके अन्न खाल्ल्याने पोटाला आराम मिळेल आणि पचनक्रियाही सुधारेल.

पुरेशी झोप घेणे

शरीर डिटॉक्स करण्यासाठी योग्य झोप घ्या. विशेषतः जड आणि तेलकट अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा खूप झोप लागते. अन्न थोडेसे पचले की पुरेशी झोप येते. यामुळे मूड सुधारतो आणि तेलकट अन्नाचा हँगओव्हरही कमी होतो.

चालणे

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला जा. हेव्ही फूड खाल्यानंतर अर्धा तास चालावे. यामुळे अन्न पचण्यास मदत होईल. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रिस्क वॉक करता येतो.

फळे आणि भाज्या खा

फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे असतात जे अन्न पचन करण्यास मदत करतात. फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बियांचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, आजच करा आहारात समावेश

आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करा

जे लोक नियमितपणे प्रोबायोटिक्स घेतात त्यांना पचनाची समस्या कधीच होत नाही. प्रोबायोटिक्स घेतल्याने आतडे सुधारतात. यासाठी दूध, दही, ताक यांचा आहारात समावेश करता येईल.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle