Home /News /heatlh /

घराजवळ, बाल्कनीत लावा ही 5 प्रकारची रोपं; डास, माशा तुमच्याकडे फिरकणार नाहीत

घराजवळ, बाल्कनीत लावा ही 5 प्रकारची रोपं; डास, माशा तुमच्याकडे फिरकणार नाहीत

डासांपासून संरक्षण करणाऱ्या 5 वनस्पती आहेत. या वनस्पती बाल्कनीचं किंवा घराच्या आजूबाजूचे सौंदर्य राखण्याबरोबरच डासांनाही घरापासून दूर ठेवतील. जाणून घेऊ या वनस्पतींविषयी..

    नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : डेंग्यू, मलेरियाच्या डासांचा वेळोवेळी प्रादुर्भाव होतो. डेंग्यू ताप आणि मलेरियासारखे आजार कधीकधी जीवघेणे ठरतात. डासांपासून संरक्षण करणाऱ्या 5 वनस्पती आहेत. या वनस्पती बाल्कनीचं किंवा घराच्या आजूबाजूचे सौंदर्य राखण्याबरोबरच डासांनाही घरापासून दूर ठेवतील. जाणून घेऊ या वनस्पतींविषयी.. सिट्रोनेला गवत - सिट्रोनेला गवत हा डासांना दूर ठेवण्याचा चांगला मार्ग आहे. या गवतातून काढलेले सिट्रोनेला तेल मेणबत्त्या, परफ्यूम, दिवे इत्यादी हर्बल उत्पादनांमध्ये वापरलं जातं. विशेष म्हणजे सिट्रोनेला गवत डासांना दूर ठेवण्यास मदत करतं. झेंडूची फुले - पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं तुमच्या बाल्कनीचं सौंदर्य तर वाढवतातच. शिवाय, माशा आणि डास या फुलांच्या सुगंधामुळे घरापासून दूर राहतात. झेंडूचे दोन प्रकार आहेत - आफ्रिकन आणि फ्रेंच. या दोन्ही वनस्पती डासांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. झेंडूची फुले पिवळ्या ते गडद केशरी रंगाची आणि लाल असू शकतात. तुळस – आपल्या संस्कृतीमध्ये घराघरांत तुळशीच्या रोपाची दररोज पूजा केली जाते. ही तुळसही विविध आजारांवर गुणकारी असण्याबरोबरच डासांना दूर ठेवण्याचेही काम करते. अशी ही तुळस खूप फायदेशीर आहे. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुळशीचं रोप किमान एका कुंडीत जरूर लावा. हे वाचा -  कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर लॅव्हेंडर – लॅव्हेंडर ही वनस्पती डासांचा शत्रू मानली जाते. डासांना दूर ठेवण्यासाठी बाजारात मिळणारी उत्पादनं त्वचा आणि आरोग्यास हानी पोहोचवतात. परंतु, डासांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी या वनस्पतीचा वापर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हानिकारक रसायनांचा वापर न करता डासांना दूर ठेवण्यासाठी लॅव्हेंडर तेल पाण्यात मिसळून थेट त्वचेवर लावले जाऊ शकते. रोझमेरी - रोझमेरी हे एक सुवासिक पानांचे सदाहरित झुडुप आहे. रोझमेरीच्या फुलांचा रंग निळा असतो. ही वनस्पतीही झेंडू आणि लॅव्हेंडर या दोन वनस्पतींप्रमाणेच नैसर्गिक डास निवारक आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी रोझमेरी मॉस्किटो रिपेलेएंटचे 4 थेंब एक चतुर्थांश ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून त्वचेवर लावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या