दिल्ली, 11 सप्टेंबर : लहानपणातील गाढ झोप (Sleeping tips) कुणालाही न विसरण्यासारखी असते. कितीही थकलेलो असोत किंवा कितीही धावपळ झालेली असो. लहानपणात अंथरूणावर लोळल्यावर काही मिनीटांतच झोप यायची. परंतु व्यक्तीचं जसंजसं वय (Age) वाढत जातं तशी ही झोप काही नाहीशी होत जाते. ते झोपेचे सुख मिळत नाही. कारण व्यक्ती हा मोठा झाल्यानंतर त्याला टेन्शन, कामाचा ताण (Work load) आणि इतर गोष्टींमुळे थकवा येत असतो.
अनेकदा आपल्याला वाटतं की आपण 9-10 तासांची छान झोप (Sleep) घेतलेली आहे. तरी देखील आपल्याला फ्रेश (Mood Fresh) वाटत नाही. कारण झोपेचे काही स्टेप्स असतात आणि त्या पुर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला फ्रेश वाटतच नाही. त्यामागे काही कारणे आहेत. ती काय आहेत आपण जाणून घेऊयात. त्यात अनेकदा आपण झोपण्याचा प्रयत्न करत असता परंतु आपल्याला झोप येत नाही. आत आपले डोळे बंद असतात, परंतु आपण झोपेत नसतो. दसऱ्या स्टेपमध्ये आपण 10-20 मिनीटं झोपलेलो असतो.
कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून माहिती समोर
परंतु यात आपण संपूर्ण शरीराने झोपेत नसतो, तर गाढ झोप लागण्याच्या प्रक्रियेत असतो. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला गाढ झोप येते पण सकाळी उठल्यानंतरही आपल्याला फ्रेश वाटत नाही, पण जर आपली झोप 8-10 तासांची असेल तर आपल्याला फ्रेश वाटते. झोपेच्या चौथ्या स्टेपमध्ये आपण गाढ झोपेत असतो ज्यात आपल्याला स्वप्नं पडत असतात. यामध्ये आपण झोप आणि जागण्याच्या स्थितीत असतो. त्यामुळे झोपताना नेहमी कुठलंही टेन्शन न घेता झोपायला हवं. त्यामुळे आपल्या शरिरालाही आराम मिळतो आणि सकाळी सकाळी फ्रेश वाटते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Sleep, Sleep benefits