मुंबई, 27 ऑक्टोबर : सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती डिओड्रंट (Deodorant) चा वापर करतो. घरातून आवरून, टापटीप होऊन निघालेले लोक ऑफिसला जाईपर्यंत घामाघूम होऊन जातात. काही लोकांच्या घामाचा अत्यंत घाण वास (Foul smell from body) असतो, अशावेळी फ्रेश राहणं अत्यंत गरजेचं असतं. यावर उपाय म्हणून डिओड्रंट (Deodorant) वापरलं जातं. तर काही जणांना बाहेर जाताना डिओ लावण्याची सवय असते. हे त्यांना एवढं सवयीचं झालेलं असतं, की डिओ वापरला नाही तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. मात्र, हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की तुम्ही आतापर्यंत डिओड्रंट (Deodorant) चा वापर चुकीच्या पद्धतीने करत आला आहात. तर आज डिओचा (Deo) योग्य वापर कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.
बहुतेक जण चुकीच्या पद्धतीने डिओ (Deo) वापरतात. सहसा लोक सकाळी उठल्यानंतर आपली दैनंदिन कामे करतात आणि घराबाहेर पडताना डिओ लावतात. जेणेकरून त्यांच्या शरीराचा दिवसभर सुंगधी वास येतो आणि फ्रेश वाटतं. मात्र, डीओचा वापर रात्रीच्या वेळी करावा, असं काही स्किनकेअर तज्ज्ञांनी सांगितलं आहे. रात्रीच्या वेळी झोपाताना डिओड्रंट (Deodorant) लावावं. जेणेकरून, ते सक्रिय होण्यास पुरेसा वेळ मिळेल.
स्किनकेअर तज्ज्ञ लुसी फॅडौल (Lucy Faddoul) यांनी सांगितले, की रात्रीच्या वेळी डिओड्रंट लावावं जेणेकरून त्याला सक्रिय (Active) होण्यास पुरेसा वेळ मिळेल. जेव्हा आपण झोपलेले असतो. तेव्हा शरीराला आराम मिळतो. आशावेळी शरीरातील घामाच्या ग्रंथी (Sweat glands) कमी प्रमाणात सक्रिय असतात. यावेळी घाम कमी येत असल्याने डिओ चांगल्या प्रकारे कार्य करू शकते.
संध्याकाळी झोपण्यापूर्वी डिओ लावताना काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचे आहे. यावेळी आपली काख पूर्णपणे स्वच्छ असावी. तसेच अँटी पर्सपायरेंट (antiperspirant) हे डिओसारखेच स्प्रे असतात. ज्यांचा वापर केल्याने घाम कमी येतो. त्यामुळे डिओचा वापर करण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी अँटी पर्सपायरेंट लावावे. तसेच दिवसभर घाम कमी यावा, अशी कोणाची इच्छा असल्यास त्यांनी रात्री झोपताना अँटी पर्सपायरंट लावावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डिओचा वापर करावा. विशेषत: ज्यांना जास्त घाम येतो, आशा व्यक्तींसाठी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला. जास्त घाम येणे याला हायपोहायड्रोसिस (Hyperhidrosis), असे म्हटले जाते. तर येथून पुढे डिओड्रंट (Deodorant) चा वापर करताना योग्य पद्धतच वापरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.