Home /News /heatlh /

त्वचेवर Aloe Vora जेल लावल्यानंतर टाळा `या` गोष्टींचा वापर, अन्यथा...

त्वचेवर Aloe Vora जेल लावल्यानंतर टाळा `या` गोष्टींचा वापर, अन्यथा...

आपला चेहरा (Face) आणि त्वचा (Skin) नितळ, सुंदर आणि आकर्षक दिसावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं.

    मुंबई, 6 ऑगस्ट : आपला चेहरा (Face) आणि त्वचा (Skin) नितळ, सुंदर आणि आकर्षक दिसावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. त्यासाठी महिला विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं (Cosmetics) वापरतात. तसंच गरजेनुसार ब्युटी ट्रीटमेंटदेखील (Beauty Treatment) घेतात. बाजारात उपलब्ध असलेल्या काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये रसायनांचा (Chemical) समावेश असतो. त्यामुळे अशी प्रसाधनं वापरण्याऐवजी अनेक महिला हर्बल किंवा आयुर्वेदिक प्रसाधनं वापरण्यावर भर देतात. त्वचेच्या आरोग्यासाठी अ‍ॅलोव्हेरा (Aloe vera) अर्थात कोरफड ही गुणकारी मानली जाते. अ‍ॅलोव्हेरा जेल (Aloe vera Gel) हे नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन असून त्वचेच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं आहे. अ‍ॅलोपॅथीमध्येही कोरफडीचा विविध प्रकारे वापर होतो. कोरफड आरोग्यासाठी उत्तम असली तरी तिचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास नुकसानदेखील होऊ शकतं. विशेषतः कोरफड चेहऱ्यावर लावल्यानंतर काही गोष्टींचा वापर टाळणं गरजेचं आहे. अर्थात यामागे काही कारणं आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. कोरफडीत अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेची खाज आणि पुरळ दूर होतात. याशिवाय कोरफड अँटिऑक्सिडंटदेखील असते. अँटिबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेवरील मुरुम (Pimples) कमी होतात. कारण यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नाहीसा होतो. कोरफड त्वचा आणि चेहऱ्यासाठी गुणकारी असली तरी ती चेहऱ्यावर लावल्यावर काही गोष्टींचा वापर करू नये. चेहरा उजळ आणि सुंदर दिसावा यासाठी महिला अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्वचेवर कोरफड किंवा अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्यानंतर लगेच चेहरा धुवू नये. यामुळे त्वचेची पीएच पातळी (PH Level) बिघडते. तुम्ही सातत्याने ही चूक केली तर त्वचेवर ठिपके येऊ शकतात. डायबेटिसच्या रुग्णांनी जास्त आंबे खाल्ले तर काय होतं? हंगाम संपला तरी ही गोष्ट नेहमी ठेवा लक्षात चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्यानंतर ते साध्या पाण्याने धुवून टाकावे. काही लोक हे जेल धुण्यासाठी फेस वॉशचा (Face Wash) वापर करतात. पण हे चुकीचं ठरू शकतं. साध्या पाण्यात कोणतीही रसायनं नसतात, त्यामुळे कोरफडीचा चेहऱ्यावर दुष्परिणाम होत नाही. फेस वॉशच्या वापराबाबत बोलायचं झालं तर चेहऱ्यावरचा तेलकटपणा आणि घाण स्वच्छ करण्यासाठी फेस वॉशचा वापर केला जातो. फेस वॉशने चेहरा धुतल्यानंतर तो एकदम स्वच्छ दिसतो. मात्र अ‍ॅलोव्हेरा जेल हेदेखील एक क्लिंझर (Cleanser) आहे. हे जेल लावून त्वचा खोलवर स्वच्छ करता येते. बाजारातील उत्पादनांमध्ये रसायनं असतात. पण कोरफडीत नैसर्गिक गुणधर्म मुबलक असतात. त्यामुळे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावल्यावर ते धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करू नये. अ‍ॅलोव्हेरा जेल धुण्यासाठी फेस वॉशचा वापर केला तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Skin care

    पुढील बातम्या