दिल्ली,24 मे : आपल्याला सगळ्यांनाच ड्रायफ्रुट(Dry Fruit) खायला आवडतं. त्यातही काजू, बदाम, पिस्त तर सर्वांच्याच आवडीचे. ड्रायफ्रुट खाण्याचे फायदे (Benefits)ही भरपूर आहेत. त्यातही बदाम खाण्याचे आरोग्य मेंदू आणि त्वचेलाही फायदे आहेत. बदमा (Almond) अनेक प्रकारे आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. बदामाचा वापर विविध पद्धतीने करता येतो. बदामाबरोबर बदाम तेलाचे (Almond Oil) ही फायदे आहे. बदाम तेलाचा वापर आरोग्य (Health) आणि सौंदर्या (Beauty)साठीही केला जातो. जाणून घेऊयात बदाम तेलाचे फायदे.
(असा बदलत गेला चेहरा...; टायगर श्रॉफची बॉलिवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण)
चेहरा उजळतो
दररोज रात्री झोपण्याआधी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचा तजेलदार (Skin Glow) बनते. डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरील डागही कमी होतात. सुरकुत्या दूर होऊन, स्किन टाईट होते. चेहरा उजळतो.
केसांना पोषण
बदाम तेलाने केसांचा रखरखीतपणा कमी होऊन, केस तमकदार बनतात. केसं तुटणं आणि गळण्याची समस्या असेल तर, बदाम तेलाचा वापर करावा. रात्री झोपताना बदाम तेलाने केसांच्या मुळांना मॉलिश करा. त्यामुळे केसचं नाहीत तर, मेंदूही तल्लख होईल.
(सुजाण पालक बना! मुलांना तुमच्यापासून दूर करण्यासाठी या 5 चुका ठरतील कारणीभूत)
थकवा दूर करतं
शरीरात थकवा असेल किंवा मसल्समध्ये वेदना असती तर, बदाम तेलाचा जरूर वापर करावा. या तेलाने दररोज मॉलिश केल्याने ज्या भागात वेदना आहेत त्या कमी होऊन, पोषणही मिळतं.|
अरोमा थेरेपी
बदाम तेलाचा वापर आरोमा थेरेपीसाठीही केला जातो. बदाम तेलाच्या वापराने शरीर रिलॅक्स होतं. तर, आरोमा थेरेपी नंतर झोपही चांगली येते. शिवाय शरीरातला थकवाही निघून जातो.
(परीक्षा रद्द, अभ्यास थांबला; पालकांनो विद्यार्थ्यांचा मानसिक आरोग्य जपा)
चांगल्या आरोग्यासाठी
बदाम तेलाचा वापर जेवणातही करतात. याच्या सेवनाने किंवा दुधात मिसळून प्यायल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. पोटाच्या समस्येतून सुटका होते. डायबेटिज कंट्रोलमध्ये राहतो. त्याशिवाय शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होऊन एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Skin care, Woman hair