मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Reliance फाउंडेशनच्या रुग्णालयात 'वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक'; ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार एकाच ठिकाणी

Reliance फाउंडेशनच्या रुग्णालयात 'वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक'; ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार एकाच ठिकाणी

Sir H. N. Reliance Foundation Hospital च्या या क्लिनिकमध्ये केवळ 2 दोन तासांत रुग्णाची तपासणी, सर्वांगीण मूल्यांकन, निदान आणि उपचार आदी सुविधा मिळणार मिळणार आहेत.

Sir H. N. Reliance Foundation Hospital च्या या क्लिनिकमध्ये केवळ 2 दोन तासांत रुग्णाची तपासणी, सर्वांगीण मूल्यांकन, निदान आणि उपचार आदी सुविधा मिळणार मिळणार आहेत.

Sir H. N. Reliance Foundation Hospital च्या या क्लिनिकमध्ये केवळ 2 दोन तासांत रुग्णाची तपासणी, सर्वांगीण मूल्यांकन, निदान आणि उपचार आदी सुविधा मिळणार मिळणार आहेत.

  मुंबई, 5 फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने (World Cancer Day)  मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फौंडेशन हॉस्पिटलला ( Sir H. N. Reliance Foundation Hospital) एक भेट मिळाली आहे. शुक्रवारपासून इथे जागतिक दर्जाचं पहिलं वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक (One Stop Breast Clinic) सुरू झालं आहे. या क्लिनिकमध्ये केवळ 2 दोन तासांत रुग्णाची तपासणी, सर्वांगीण मूल्यांकन, निदान आणि उपचार आदी सुविधा मिळणार मिळणार आहेत. या क्लिनिकचं उद्घाटन रिलायन्स फौंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा नीता मुकेश अंबानी (Neeta Mukesh Ambani) यांच्या हस्ते झालं.

  आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगासाठी प्रचलित असणारी उपचार पद्धती लक्षात घेऊन या वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिकची उभारणी करण्यात आली आहे. यात लंडनमधील गाइस हॉस्पिटलचे ब्रेस्ट ट्युमर पथक आणि क्लिनिकल प्रमुख, अध्यक्ष डॉ. आशुतोष कोठारी देखील सहभागी झाले आहेत. आम्ही केवळ एका कर्करोग निवारण विभागाचीच नव्हे तर देशातील सर्वेत्तम पुर्नवसन केंद्राची स्थापना केली असल्याचं यावेळी नीता अंबानी यांनी सांगितलं. यावेळी त्या म्हणाल्या की, 'ही लढाई लढत असलेल्या प्रत्येक स्त्रीसाठी, या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक रुग्ण जो या क्लिनिकमध्ये येईल, त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या क्लिनिकमध्ये मिळतील, अशी मला अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या भितीवर विजय मिळवता येईल, अशी आशा मी करते. सुरुवातीपासून प्रत्येक भारतीय नागरिकाला कमी दरात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, हे आमचं ध्येय होते. कर्करोग निवारण (Oncnology Sector) क्षेत्रावर पहिल्यापासून आमचं लक्ष होतं. एक भारतीय आणि त्यातही एक स्त्री म्हणून वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिकची घोषणा करणे हे मी माझे भाग्य समजते.'

  सर एच. एन. रिलायन्स फौंडेशन हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. विजय हरिभक्ती म्हणाले की, 'स्तनांचा कर्करोगाचं निदान झालं की स्त्रिया घाबरतात. गोंधळलेल्या स्थितीत असतात, अनेक पर्यायांना देखील घाबरतात. त्यामुळे त्यांना एकत्रित सल्ला देणं आवश्यक आहे. आमचं ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिक (Breast Cancer Clinic) रुग्णांची उत्तम काळजी घेण्याचा आणि त्यांना सर्वतोपरी मदत देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जगभरातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वात सामान्य असा कॅन्सरचा प्रकार आहे. शहरी भागातील 22 पैकी 1 महिलेला तिच्या जीवनात ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते, असंही त्यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Breast cancer, Health, Neeta ambani