मराठी बातम्या /बातम्या /heatlh /जास्त कॉफी पिऊ नका...अन्यथा होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

जास्त कॉफी पिऊ नका...अन्यथा होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

कॉफी पिणं कसं अपायकारक ठरू शकतं याविषयी फारशी माहिती लोकांना नसते. त्यामुळे जाणून घेऊया कॉफीच्या दुष्परिणामांविषयी.

कॉफी पिणं कसं अपायकारक ठरू शकतं याविषयी फारशी माहिती लोकांना नसते. त्यामुळे जाणून घेऊया कॉफीच्या दुष्परिणामांविषयी.

कॉफी पिणं कसं अपायकारक ठरू शकतं याविषयी फारशी माहिती लोकांना नसते. त्यामुळे जाणून घेऊया कॉफीच्या दुष्परिणामांविषयी.

  मुंबई 2 ऑगस्ट: आपण दिवसभर काम करत असतो. त्यामुळे शरीराला थकवा येतो किंवा मनाला कंटळवणां वाटतं. मग आपण काय करतो तर उत्साह आणणारं काही पेय घेतो. सामान्यपणे चहा हे पेय जनमानसाच्या आवडीचं असतं. पण असंच कॉफी (Coffee) हे दैनंदिन सेवन केलं जाणारं अनेकांच्या आवडीचं पेय आहे. दिवसभराच्या कामकाजातून थोडा मोकळा वेळ मिळाला तर रिफ्रेश (Refresh) होण्यासाठी अनेक जण कॉफी घेण्यास प्राधान्य देतात. कामामुळे आलेला थकवा, डोकंदुखी सारख्या समस्या दूर होऊन मूड रिफ्रेश होण्यासाठी लोक कॉफी पितात. तसं तर कॉफीमध्ये अनेक पोषणमूल्य असतात. परंतु, तुम्ही जर दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पित असाल तर ही बाब शरीरासाठी नुकसानदायी ठरु शकते. कॉफी पिण्याचे तसे फायदे अनेक असले तर अतिप्रमाणात कॉफी पिणं कसं अपायकारक ठरू शकतं याविषयी फारशी माहिती लोकांना नसते. त्यामुळे जाणून घेऊया कॉफीच्या दुष्परिणामांविषयी.

  मूड फ्रेश करणारी, काही शारीरिक समस्या दूर करणारी कॉफी जर तुम्ही दिवसभरात प्रमाणापेक्षा अधिक पित असाल तर त्यामुळे आजाराचा सामना करावा लागू शकतो. एका अभ्यासानुसार दिवसभरात 6 कपांपेक्षा अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्यास डिमेन्शिया किंवा स्मृतिभंशासारखा (Dementia) मानसिक विकार जडू शकतो. तसेच हार्ट अटॅक (Heart Attack), ब्लडप्रेशरसह अन्य समस्या निर्माण होऊ शकतात.

  हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...

  कॉफी प्यायल्यानं भलेही ऊर्जा मिळत असली तरी अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्यास याउलट परिणाम देखील दिसून येतात. कॉफीत कॅफीन (Caffeine) हा घटक मोठ्या प्रमाणात असल्यानं जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास सुस्ती येणं किंवा आळसवाणं वाटू शकतं. तसेच शारीरिक थकवाही जाणवतो.

  अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढू शकतं. तसेच हाय ब्लडप्रेशर किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील पेशींचं नुकसान होऊ शकतं. अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्याने हृयतील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अॅटॅक (Heart Attack) येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लडप्रेशर आहे त्यांनी अधिक प्रमाणात कॉफी घेणं टाळावं.

  रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा किती होतात फायदे

  कॉफी प्यायल्यानं आळस दूर होतो. जर कोणी मन लावून काम करत असेल तर अलर्ट राहण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरते. मात्र जास्त प्रमाणात कॅफीन शरीरात गेल्यानं रात्रीच्या झोपेवर (Sleep) परिणाम होऊन स्लिपिंग पॅटर्न खराब होण्याची शक्यता वाढते.

  कॉफी प्यायल्याने शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होतो. कॉफी प्यायल्यानंतर ग्रॅस्ट्रीन हार्मोन रिलीज होतो. यामुळे कोलन अॅक्टिव्हिटी वाढते. अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्यानं पोट खराब होऊन पचनशक्तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसंच अन्य समस्या देखील जाणवू शकतात. तसेच अधिक प्रमाणात कॉफी घेतल्यास डिम्नेशिया नावाचा मानसिक आजार जडू शकतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Coffee, Health Tips