मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Health Tips : जास्तच नव्हे तर कमी मीठ खाल्ल्यानं देखील आरोग्यावर होतात असे परिणाम

Health Tips : जास्तच नव्हे तर कमी मीठ खाल्ल्यानं देखील आरोग्यावर होतात असे परिणाम

Eating Less Salt : जास्त प्रमाणात मीठ खाणे (side effects of eating less salt) हानिकारक असू शकते, तसेच त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यानेही आरोग्यास काही नुकसान होऊ शकते.

  • Published by:  News18 Desk

Eating Less Salt : आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दैनंदिन आहारात मीठाचे सेवन खूप कमी करतात. कारण ते अनेकदा ऐकत आणि वाचत राहतात की मीठ आणि साखर जास्त प्रमाणात घेऊ नये. जास्त मीठ न घेणे आणि ते अजिबात न घेणे यात मोठा फरक आहे. वास्तविक, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सर्वकाही योग्य प्रमाणात आवश्यक आहे. जास्त प्रमाणात मीठ खाणे (side effects of eating less salt) हानिकारक असू शकते, तसेच त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यानेही आरोग्यास काही नुकसान होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया

कमी रक्तदाबाचा धोका (Low Blood Pressuer)

शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सोडियम योग्य प्रमाणात आवश्यक आहे. खूप कमी मीठाचे सेवन शरीरात घेतल्यानं रक्तदाब कमी होऊ शकतो. ज्यामुळे कधी-कधी रक्तदाब खूप कमी होण्याची शक्यता असते आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर अनेक समस्यांचा त्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो.

शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध वाढण्याचा धोका

आपल्या शरीराला दररोज विशिष्ट प्रमाणात मीठाची गरज असते. जर तुम्ही खूप कमी मीठ खाल्ले तर शरीरात इन्सुलिन प्रतिरोध वाढण्याचा धोका असतो. जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिन हार्मोनच्या संकेतांना प्रतिसाद देतात तेव्हा असे होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे टाइप 2 चा मधुमेह आणि हृदयरोग होऊ शकतो.

हे वाचा - Heart Attack मुळे दररोज मरताहेत चारातले 3 लोक; धक्कादायक आकडेवारी आली समोर!

मधुमेही रुग्णांना धोका

जर मधुमेहाचा रुग्ण योग्य प्रमाणात मीठ वापरत नसेल तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, कमी मीठाचे सेवन टाईप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप धोकादायक ठरू शकते.

शरीर थकणे आणि सुस्ती

शरीरातील आवश्यक प्रमाणापेक्षा कमी मीठ खाल्ल्याने थकवा आणि शरीरात सुस्ती येऊ शकते. ज्यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करताना आळस येतो, काम करणे नकोसे वाटते आणि कोणतेही काम योग्य प्रकारे करता येत नाही.

(सूचना : या लेखात दिलेले उपाय सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही हमी देऊ शकत नाही. कृपया वरील माहितीची अंमलबजावणी करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

First published:

Tags: Health, Health Tips