मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बाळ झाल्यानंतर किंवा प्रेग्नेंसीदरम्यान शरीरसंबंध ठेवावेत का? विवाहित जोडप्याला माहित असाव्यात 'या' गोष्टी

बाळ झाल्यानंतर किंवा प्रेग्नेंसीदरम्यान शरीरसंबंध ठेवावेत का? विवाहित जोडप्याला माहित असाव्यात 'या' गोष्टी

प्रसूती दोन प्रकारची होते. एक सिझेरियन आणि दुसरी नॉर्मल. परंतु हे लक्षात ठेवा की, प्रसूती तुमची कशीही झाली असली, तरी त्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो.

प्रसूती दोन प्रकारची होते. एक सिझेरियन आणि दुसरी नॉर्मल. परंतु हे लक्षात ठेवा की, प्रसूती तुमची कशीही झाली असली, तरी त्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो.

प्रसूती दोन प्रकारची होते. एक सिझेरियन आणि दुसरी नॉर्मल. परंतु हे लक्षात ठेवा की, प्रसूती तुमची कशीही झाली असली, तरी त्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक तरुण-तरुणीचं आयुष्याच खूप मोठे बदल होतात. कारण यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते. ज्यामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात, जसं की घर सांभाळणे, घर खर्च, मुलं सांभाळणे, त्यांचा खर्च इत्यादी. खरंतर यामध्ये खरी तारेवरची कसरत करावी लागते ती महिलांना कारण त्यांच्यासाठी नवीन लोक, नवीन गोष्टी, नवीन घर इथूनच सगळी सुरुवात असते. ज्याच्याशी त्यांना मिळतं जुळतं घ्यावं लागतं.

यासगळ्यात मुलींच्या वैवाहिक जिवनात देखील बदल होतात. परंतू या दरम्यान मुलींना लग्नानंतर अनेक प्रश्न पडतात, ज्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुलींना मिळतातच असं नाही. त्यांपैकी एक प्रश्नासंदर्भात काही माहिती घेऊन आम्ही आलेलो आहेत.

हे प्रश्न अनेक महिलांना किंवा जोडप्यांना प्रश्न पडतो, ते म्हणेज गरोदरपणात सेक्स करणं योग्य आहे का? आणि दुसरं म्हणजे प्रसूतीनंतर किती दिवसांनी सेक्स केलं पाहिजे? बऱ्याच लोकांना हे प्रश्न तर पडतात, पण याची उत्तर सापडत नाहीत आणि डॉक्टरांना विचारण्यासाठी देखील त्यांना लाज वाटते. मग तुमच्या मनात देखील असे प्रश्न उद्भवले असतील, तर चला जाणून घेऊ या प्रश्नांमागची उत्तरं...

प्रसूतीनंतर केव्हा शरीर सबंध ठेवावे?

तसे पाहाता प्रसूती दोन प्रकारची होते. एक सिझेरियन आणि दुसरी नॉर्मल. परंतु हे लक्षात ठेवा की, प्रसूती तुमची कशीही झाली असली, तरी त्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो.

नॉर्मल प्रसूतीनंतर लगेलच शरीर सबंध ठेवले केलंच तर काय होईल?

जर एखाद्या महिलेची प्रसूती सामान्य पद्धतीने झाली असेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच महिलेच्या पोटातील प्लेसेंटा बाहेर पडल्यामुळे गर्भाशयाला दुखापत होते. ही जखम भरून येण्यासाठी वेळ लागतो. अशा स्थितीत संबंध बनवल्याने स्त्रीच्या शरीरालाही हानी पोहोचते. त्यामुळे नॉर्मल प्रसूतीनंतर किमान दीड महिना शारीरिक संबंध टाळावेत.

सिझेरियन प्रसूतीनंतर या गोष्टीची काळजी घ्या

सिझेरियन प्रसूतीदरम्यान पोटाच्या खालच्या भागात जास्त टाके येतात. यातून स्त्रीयांना सावरायला खूप वेळ लागतो. यास्थितीत शारीरिक संबंध ठेवल्यास हे टाके तुटण्याचा धोका असतो. जर टाके उघडले तर त्यामध्ये पू भरु शकतो, ज्यामुळे समस्या आणखी वाढतात. तसेच याचा महिलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे प्रसूतीनंतर टाके पूर्णपणे कोरडे होईपर्यंत अंतर ठेवणे खुपच गरजेचे आहे. त्यामुळे हा कालावधी दोन ते तीन महिन्यांपेक्षा जास्त असू शकतो.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ल नक्की घ्या)

First published:

Tags: Digital prime time, Relationship, Women