मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

मातांनो सावधान ! दुसऱ्या लाटेत बाळांना कोरोनाचा धोका वाढला

मातांनो सावधान ! दुसऱ्या लाटेत बाळांना कोरोनाचा धोका वाढला

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

Coronavirus second wave: कोरोना व्हायरस संसर्ग असताना बाळाचा जन्म झाल्यास आईमुळे बाळालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तशी उदाहरणं दिसू लागली आहेत. पहिल्या लाटेत असं होत नव्हतं.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 5 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Corona) लहान मुलं आणि गर्भवती महिलांना धोका वाढलेला आहे. कोरोना व्हायरस (Corona virus)च्या या स्ट्रेनने लहान मुलांवह हल्ला सुरु केला असल्याने सरकारनेही अलर्ट जारी केला आहे. पालकांना आपल्या मुलांची काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे. तर आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात गाईड लाईन (Guide Line) सर्क्युलर जारी केलं आहे. मात्र, आता पुढे आलेल्या माहिती नुसार गर्भवती महिला (Extremely Risky for Pregnant Women) आणि नवजास शिशुंना कोरोनाची लागण होत असून मृत्यूचीही शक्यता आहे.

गर्भवती असताना कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी घ्यावी लागणारी औषधं, आयसोलशनमुळे येणारा एकटेपणा याचाही त्रास महिलांना होऊ शकतो. त्यातच कोरोना व्हायरस इन्फेक्शन असताना बाळाचा जन्म झाल्यास आईमुळे बाळालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. याआधीच्या लाटेत आई कोरोना पॉझिटीव्ह असूनही बाळाला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नगण्य होती. मात्र, आता कोरोनाची नवजात बाळाला लागण होऊ शकते असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.

(...तर कोरोना निदानासाठी RT-PCR TEST करू नका; ICMR च्या नव्या गाइडलाइन्स)

गर्भवतींना धोका किती ?

पहिल्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांमुळे त्यांच्या बाळांना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचा दावा चिनी वैज्ञानिकांनी केला होता. गर्भवती महिला संक्रमित असली तरी बाळामध्ये कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदली आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे. महिलांना कोरोनाची लागण झाली असली, त्यांच्यांत इतर रुग्णांप्रमाणे लक्षणं दिसत नसली तरीही बाळाला त्याचा संसर्ग होऊ शकतो. कोरोना संक्रमण झालेल्या महिलांमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण होऊन, हॉस्पिटलायझेशनची गरज पडू शकते.

व्हायरल ट्रान्समिशन

गरोदर मातेमुळे जन्माला आलेल्या बाळला कोरोना होण्याची शक्यता असते. गरोदर असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह (Positive) झाल्यास बाळालाही बाधा होण्याची श्यक्यता सर्वाधिक असते. बाळ जन्मल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात येते. बालक कोरोना पॉझिटीव्ह असल्यास उपचार सुरु करण्यात येतात. मात्र प्रौढांसाठी असलेली उपचार पद्धती शिशूंसाठी वापरता येत नाही. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. मात्र, कोरोनामुळे आईला जेवढा धोका असतो तेवढा, बाळाला नसतो. यासंदर्भात संशोधनानुसार बाळांना कोरोना झाला तरी, धोका कमी असल्यांचं समोर आलं आहे, मात्र, गर्भवती महिलींनी विषेश काळजी घ्यायला हवी, डिलीव्हरीच्या शेवटच्या दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास अडचणी वाढू शकता. प्रिमॅच्यूअर डिलीव्हरीचीही शक्यता असते.

(मेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात; लाखोंची उलाढाल)

गर्भवती महिला आणि लसीकरण

गर्भवती महिलेमुळे बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी कोणते उपाय करता येतील यावर संशोधन करण्यात आलं आहे. त्यानुसार, ठराविक केसमध्ये कोरोना (COVID-19) लसीकरण केल्यास आईच्या शरिरात एन्टीबॉडिजची (Antibodies) निर्मीती झाल्याने बाळाला कोरोनाचा धोका कमी होतो. बाळ स्तनपान करत असेल तर, त्याला त्यातून एन्टीबॉडिज मिळू शकतात. आईच्या गर्भात असाना नाळेद्वारे एन्टीबॉडिज मिळू शकतात. त्यामुळेच कोरोनाचा धोका पाहता आता डॉक्टर देखील गर्भवती महिलांना COVID-19 लसीकरणासाठी प्रोत्साहीत करत आहेत.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Pregnant woman