Home /News /heatlh /

National Nutrition Week: चुकीचं खाणं-पिणंही ठरतं कॅन्सर, डायबिटीजचं कारण, योग्य आहाराचा असा आहे फॉर्म्युला

National Nutrition Week: चुकीचं खाणं-पिणंही ठरतं कॅन्सर, डायबिटीजचं कारण, योग्य आहाराचा असा आहे फॉर्म्युला

रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

जगभरात दर पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होतो. हे संशोधन 1990 ते 2017 दरम्यान जगातील 195 देशांमध्ये करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मग प्रश्न पडतो की योग्य आहार कोणता?

    मुंबई, 05 सप्टेंबर : देशात 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) साजरा केला जात आहे. योग्य खाणे, म्हणजे निरोगी आहार, तो केवळ मुलांच्या वाढीस मदत करत नाही, तर तो तरुणांना अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर योग्य आहार (Which is the right diet) घेतला तर तरुणांना लठ्ठपणा, मधुमेह-2 आणि हृदयाच्या समस्यांसह अनेक कर्करोगांचा धोका टाळता येईल. दैनिक भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जगात पाचपैकी एक मृत्यू फक्त चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होतो. या अहवालात, आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ डॉ.देबजानी बॅनर्जी यांनी लिहिले आहे की, अमेरिकेत 2 ते 19 वर्षे वयोगटातील सुमारे 19 टक्के तरुण आणि 19 वयापेक्षा जास्त 40 टक्के लोक हे लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. या कारणास्तव त्यांच्यामध्ये टाइप -2 मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो. बॅनर्जी यांनी पुढे लिहिले आहे, द लॅन्सेट या विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जगभरात दर पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होतो. हे संशोधन 1990 ते 2017 दरम्यान जगातील 195 देशांमध्ये करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मग प्रश्न पडतो की योग्य आहार कोणता? हे वाचा - हार्ट प्रॉब्लेम आणि डिप्रेशनचा सामना करतायत सायरा बानू; एन्जिओग्राफीला दिला नकार वैद्यकीय माहितीनुसार, जर तुम्ही अन्न हे दोन भागांमध्ये खात असाल, म्हणजे अर्धा भाग फळे आणि भाज्या आणि उर्वरित भागात प्रथिने आणि कार्बोहायड्रेटयुक्त अन्न घेत असाल तर ही आदर्श पद्धत आहे. याचा अर्थ असा की आपली अर्धी भूक फळे आणि भाज्यांवर संपली पाहिजे. चुकीचा आहार घेतल्याने या आजारांचा धोका हृदयाची समस्या आरोग्यासाठी हानिकारक असा आहार घेतल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो आणि यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त प्रमाणात सोडियम किंवा मीठ घेणे. जास्त प्रमाणात सोडियममुळे रक्तदाब (उच्च रक्तदाब) वाढतो. तसेच रक्तवाहिन्यांना नुकसान होते. मात्र, आहारातील मीठ पूर्णपणे टाळणेही योग्य नसते. हे वाचा - स्वयंपाक करताना ही चूक केली तर ताजं शिजवलेलं खाऊनही काहीच फायदा होणार नाही मधुमेह आपण खात असलेले अन्न आपल्या शरीरातील ग्लुकोजमध्ये बदलते, ज्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. गोड पदार्थ शरीरात वेगाने शोषले जातात. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. आजकाल, खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे. जे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. कर्करोग निरोगी शरीरासाठी सूक्ष्म पोषक घटकांचा म्हणजेच प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचा समतोल खूप महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फाउंडेशनच्या मते, चिप्स, बर्गर, चॉकलेट, बिस्किटे इत्यादी उच्च चरबी आणि साखरयुक्त पदार्थांमुळे शरीरातील चरबी वाढते. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार लठ्ठपणामुळे 12 प्रकारचे कर्करोग होतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cancer, Health, Health Tips

    पुढील बातम्या