मराठी बातम्या /बातम्या /heatlh /लसी आपल्याला जवळ आणतात: एक वैश्विक चित्र

लसी आपल्याला जवळ आणतात: एक वैश्विक चित्र

वैश्विक लसीकरणातील सहकार्य म्हणजे देश आता त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाच्या कार्यक्षमतेवरील वास्तविक डेटा सामायिक करू शकतात, आणि एकमेकांच्या अनुभवांमधून शिकू शकतात.

वैश्विक लसीकरणातील सहकार्य म्हणजे देश आता त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाच्या कार्यक्षमतेवरील वास्तविक डेटा सामायिक करू शकतात, आणि एकमेकांच्या अनुभवांमधून शिकू शकतात.

वैश्विक लसीकरणातील सहकार्य म्हणजे देश आता त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाच्या कार्यक्षमतेवरील वास्तविक डेटा सामायिक करू शकतात, आणि एकमेकांच्या अनुभवांमधून शिकू शकतात.

    ब्राझील आणि भारत हे अक्षरशः जगाच्या दोन विरुद्ध टोकाकडचे देश आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या या दोन्ही भव्य देशांचे एकमेकांशी काही व्यापारी संबंध आणि लोकांचे एकमेकांशी काही परस्परसंबंध होते. म्हणूनच, या वर्षाच्या प्रारंभी Covishield (कोविशील्ड) लसीचे 2 दशलक्ष डोसेजचे शिपमेंट प्राप्त झाल्यावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धन्यवाद’ अस ट्विट केल्यानंतर कोविड-19 च्या विरोधात चालू असलेल्या लढाईच्या निमित्ताने वैश्विक सहकार्याचे एक नवे पर्व सुरु झाले आहे. प्रत्येक देश या महामारीमुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या अंतर्गत समस्यांशी झुंजत असतानाही जागतिक स्तरावरील सुरु झालेल्या एका प्रतिरोधासाठीच्या मोहिमेचे हे प्रतीक बनले आहे.

    या महामारीच्या अगदी सुरुवातीला देशांना या व्हायरसशी लढण्यासाठी बुद्धीमत्ता आणि ज्ञान सामायिक करण्याची गरज असल्याची झालेली जाणीव हे या जागतिक एकीकरणाचे कारण आहे. जरी सीमा बंद होत्या तरीही सहकार्याचे प्रमाण वाढले आहे, विशेषतः लास विकसित आणि वितरीत करण्याच्या क्षेत्रात. आता, WHO( डब्ल्यूएचओ), Centre for Epidemic Preparedness (CEPI) (सेंटर फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस(सीईपीआय))and the Gavi Vaccine Alliance(गावी व्हॅक्सीन अलायन्स), यांसारख्या संस्था या प्रयत्नांना मार्गदर्शन करत आहेत, आणि जगभरात लसीचे न्याय्य वितरण करण्यासाठी तज्ञ आणि नीती रचनाकार यांना नियुक्त करण्यात आले आहेत.

    ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरीही काही धोके संभवतात. संस्थांनी जीवनाश्यक वस्तूंच्या असमान वितरण, मालाच्या वाह्तुकीच्या सुरक्षेतील धोके, स्थानिक अशांतता आणि जगाच्या विविध भागातील लोकांची मान्यता नसणे, लसीकरण कार्यक्रम राबवण्यामध्ये अडथळा बनू शकतात. पण यात धोके असले तरीही यात संधीसुद्धा आहेत. वैश्विक लसीकरणातील सहकार्य म्हणजे देश आता त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाच्या कार्यक्षमतेवरील वास्तविक डेटा सामायिक करू शकतात, आणि एकमेकांच्या अनुभवांमधून शिकू शकतात. श्रीमंत देशांना लसींचा साठा करण्यापासून रोखण्यासाठी COVID-19 Vaccines Global Access Group (COVAX) (कोविड-19 व्हॅक्सिन्स ग्लोबल अॅक्सेस ग्रुप(कोवॅक्स))(सीओव्हीएएक्स) सारख्या आंतरराष्ट्रीय यंत्रणादेखील उपलब्ध आहेत, ज्या गरीब देशांना जास्तीची लस देता यावी म्हणून प्रयत्नशील आहेत.

    पण या वैश्विक ऐक्याच्या या चित्रामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे लसीकरणाच्या न्याय्य वितरणाचे स्पष्ट फायदे. गरीब देशांना लसी दान करण्यासाठी श्रीमंत देशांकडून खर्च केली जाणारी किंमत नक्कीच गुंतवणुकीतून चांगला परतावा देईल, यामुळे ही महामारी लवकरात लवकर नष्ट होण्यास आणि अर्थव्यवस्था चटकन सावरण्यास मदत होईल. या अशा परिस्थितीत निर्माण झालेले हे नवीन करार, आणि आणखी दृढ झालेले आधीचे संबंध यांमुळे जग आणखी एकसंध होण्यास मदत होईल जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी अधिक सुसज्ज असेल. नागरिकांसाठीही आपल्यातील मतभेदांना व्यापकपणे छेद देणाऱ्या आपल्या सर्वसामान्य अनुभवांप्रति सहानुभूती ठेवण्याचा आणि प्रेमाने काळजी घेण्याचा हा क्षण आहे.

    हे वैश्विक सहकार्याचे नवे पर्व संसर्गाचा मोठा धोका असलेल्या व कोविड-19च्या विरोधात पुरेसे लसीकरण उपलब्ध नसलेल्या अशा अत्यंत मागासलेल्या आणि असुरक्षित घटकांसाठी निःस्वार्थ संबंधांना पुष्टी देत आहे. याच पेचातून प्रेरित होऊन Federal Bank ने Network18 ‘Sanjeevani – A Shot of Life’ (नेटवर्क 18 ‘संजीवनी-अ शॉट ऑफ लाईफ’)ही भारतातील सर्वांत मोठी मोहीम अर्थात विशेष CSR उपक्रम हाती घेतला. भारताच्या आरोग्य आणि कोविड-19 लसी मिळवण्याच्या संधींचा आणि सर्व भारतीयांपर्यंत माहितीचा प्रसार करण्यासाठी या चळवळीत सहभागी व्हा. हे जग आणखी चांगले बनवण्यासाठी आपल्याला मिळालेली ही एक संधी आहे.

    द्वारे: अनिल परमार, संचालक, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट, NGO(एनजीओ) पार्टनरयुनायटेड वे मुंबई

    First published:
    top videos

      Tags: Sanjeevani