मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयरोग, पक्षाघाताचा गंभीर धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयरोग, पक्षाघाताचा गंभीर धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) कोलेस्ट्रॉल साठून रहायला सुरुवात होते. परिणामी, हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि यामुळे हृदयरोग व पक्षाघात आदी आजारांचा धोका वाढत जातो.

रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) कोलेस्ट्रॉल साठून रहायला सुरुवात होते. परिणामी, हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि यामुळे हृदयरोग व पक्षाघात आदी आजारांचा धोका वाढत जातो.

रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) कोलेस्ट्रॉल साठून रहायला सुरुवात होते. परिणामी, हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि यामुळे हृदयरोग व पक्षाघात आदी आजारांचा धोका वाढत जातो.

मुंबई, 13 ऑगस्ट : धकाधकीच्या जीवनात स्वत:ला निरोगी ठेवणं हे खूप मोठं आव्हान आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या दोन गोष्टींच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता आपण करू शकतो. पण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे हृदयरोग (Heart Disease), डायबेटिस (Diabetes), पक्षाघात (Stroke) अशा आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. शरीराला कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) खूप गरज असते; पण रक्तातील याची पातळी वाढली तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कोलेस्ट्रॉलची पातळी धोकादायकरित्या वाढत असल्यास पायांवर त्याची काही लक्षणं दिसून येतात. आज तकने या संदर्भात वृत्त दिलं आहे. कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तात असतं. रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) कोलेस्ट्रॉल साठून रहायला सुरुवात होते. परिणामी, हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि यामुळे हृदयरोग व पक्षाघात आदी आजारांचा धोका वाढत जातो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचे काहीवेळा संकेत मिळतात तर काही वेळा ते मिळतही नाहीत. एका अभ्यासानुसार, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर काही वेळा पायांवर त्याची लक्षणं दिसून दिसतात. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर पेरीफेरल आर्टरी डिसीज (Peripheral arterial disease) या समस्येचा सामना करावा लागू शकतो. या आजारात रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते आणि त्या संकुचित होतात. परिणामी हात आणि पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होतो. पायांपर्यंत योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होत नसल्याने एखाद्या व्यक्तीला चालताना खूप वेदना होतात. पायांचा रंग बदलणं हे पेरीफेरल आर्टरी डिसीजचं मुख्य लक्षण आहे. पायांचा रंग हळूहळू निळा पडत असेल तर पायामध्ये रक्त साठत असतं. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. यामुळे शरीरात सतत वेदना होण्याची समस्या उद्भवते. प्रचंड अशक्तपणा, हातपाय सुजणं, अवयवांच्या रंगांत बदल होणं अशी लक्षणं दिसतात. या समस्येपासून सुटका करण्यासाठी शरीरातील कॉलेस्टेरॉलच्या पातळीवर नियंत्रण आणणं अत्यंत आवश्यक असतं. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार, एक चांगला तर दुसरा घातक कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तातील एक प्रकारचा मेणासारखा (Wax) घटक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉलचे हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन (High Density Lipoprotein) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटिन (Low Density Lipoprotein) हे दोन प्रकार असतात. यात एचडीएलला चांगलं कोलेस्ट्रॉल मानलं जातं. याची शरीरालाही खूप गरज असते. तर एलडीएलची वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून ओळख आहे. यामुळे हृदयरोग आणि पक्षाघात आदी समस्यांचा धोका वाढत असतो. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेलं अन्न न खाणं टाळावं. कारण यात चरबीचं (Fats) प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आहारात फळ, भाज्या, काजू, बदाम यांचा समावेश केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. रेड मीटचं सेवन न करता चिकन खाणंही चांगलं आहे. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे ताणतणाव आणि संतुलित आहार नसल्याने हाय कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते; पण आहार, जीवनशैलीवर लक्ष केंद्रीत करून व्यायामात सातत्य ठेवल्यास यावर मातही करता येऊ शकते.
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या