मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Dengue Fever: पावसाळ्यात वाढतोय डेंग्यूचा धोका; अत्यंत फायदेशीर ठरतील 'ही' 5 घरगुती औषधं

Dengue Fever: पावसाळ्यात वाढतोय डेंग्यूचा धोका; अत्यंत फायदेशीर ठरतील 'ही' 5 घरगुती औषधं

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळलं आहे. अनेकदा डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं.

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळलं आहे. अनेकदा डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं.

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळलं आहे. अनेकदा डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं.

 मुंबई, 8 ऑगस्ट-  पावसाळ्यात आढळणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू हा एक मुख्य आजार आहे. डास चावल्यामुळे डेंग्यू होतो हे तर आपल्याला माहिती आहे. डेंग्यूचा संसर्ग प्रसार Aedes aegypti या डासांमुळे होतो. तर Ae.albopictus हा डासही डेंग्यूच्या संसर्गास कारणीभूत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळलं आहे. अनेकदा डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. ही लक्षणं वेळीच लक्षात आली तर डेंग्यूनं गंभीर रुप धारण करण्यापूर्वी त्याच्यावर वेळेवर उपचार करता येऊ शकतात.The Health Site.com या वेबसाईटवर याबद्दलच अधिक माहिती देण्यात आली आहे. डेंग्यूची लक्षणं डेंग्यू  हा संसर्गजन्य आजार आहे. संसर्ग असलेला डास चावल्यामुळे हा आजार होतो. जेव्हा डेंग्यूचा विषाणू  शरीरात प्रवेश करतो, तेव्हा साधारणपणे फ्लूसारखीच  लक्षणं जाणवतात. म्हणजे ताप, घसा खवखवणं, डोकेदुखी, मळमळ आणि उलटी. ही लक्षणं सहसा 2 ते 7 दिवस राहतात (अन्य धोकादायक घटक कोणते आहेत त्यावर आधारित.) डास चावल्यानंतर साधारणत: 4 ते 10 दिवसांच्या कालावधीत ही लक्षणं जाणवायला सुरुवात होते. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितल्यानुसार डेंग्यूवर किंवा डेंग्यू जास्त गंभीर स्वरूपाचा होऊ नये यासाठी विशिष्ट असे कोणतेही उपचार नाहीत. मात्र या संसर्गजन्य आजाराचं वेळीच निदान झालं तर डेंग्यू जास्त गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपचार करता येऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डेंग्यूच्या तापावरील आयुर्वेदिक उपचार - डेंग्यूवर विशिष्ट असे उपचार नसतील तर मग त्यावर नेमकं काय करायचं? त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत. अर्थात या आयुर्वेदिक उपचारांमुळे डेंग्यू पूर्णपणे बरा होत नाही. पण त्याची काही लक्षणं कमी करण्यात मात्र या उपचारांचा नक्की फायदा होऊ शकतो. डेंग्यूचा त्रास कमी करण्यासाठीचे पाच आयुर्वेदिक घरगुती उपचार पाहू या. कडुनिंब- कडुनिंबाच्या पानांना जादुई पानं म्हटलं जातं. ते खरंही आहे. कडुनिंबाची पानं ही जंतूनाशक आणि दाह कमी करणारी असतात. डेंग्यूच्या तापावर ही पानं अत्यंत गुणकारी असतात असं गेली अनेक वर्षे केलेल्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. आयुर्वेदानुसार, कडुनिंबाच्या पानांचा अर्क किंवा रस हा चारपैंकी एका प्रकारच्या डेंग्यूची वाढ होण्यापासून रोखण्यावर अत्यंत परिणामकारक असतो. कडुनिंबाची पानं अगदी सहज उपलब्ध असतात. गुळवेल गुळवेल हे आयुर्वेदातील एक सर्वोत्तम औषध मानलं जातं. याला गिलॉय या नावानेही ओळखलं जातं. (शास्त्रीय नाव- Tinospra cordifolia) डेंग्यूच्या तापामुळे होणारे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी गुळवेल अत्यंत उपयुक्त आहे. गुळवेल पाण्यात घालून घेतल्यास त्यामुळे डेंग्युच्या रुग्णाला लक्षणं कमी होण्यास मदत होते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (हे वाचा: Purple potato: जांभळ्या रंगाचे असे बटाटे कधी खाल्लेत का? आरोग्यासाठी मिळतात इतके आरोग्य फायदे) पपई- पपई (Papaya)अगदी सहज उपलब्ध असणारं फळ आहे. आशियाई स्वयंपाकघरात तर पपईपासून विविध पदार्थ केले जातात. डेंग्युच्या लक्षणांवर उपचार म्हणून पपई गुणकारी मानली जाते. मलेरियापासून बचावासाठी पपईचा चांगला उपयोग होतोच पण डेंग्युवरील उपचारांमध्येही पपई अत्यंत परिणामकारक आहे असं अभ्यासातून समोर आलं आहे. आयुर्वेदिक पेस्ट- डेंग्यूमध्ये उठणाऱ्या पुरळांवर चंदन आणि गुलाबपाण्याची पेस्ट (Ayurvedic Paste) अत्यंत गुणकारी असते. यामुळे दाह कमी होतो. अर्थात हा फक्त तात्पुरता उपचार आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही पेस्ट लावू नये. (हे वाचा:किडनीला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी करा घरगुती उपाय; 'हे' डिटॉक्स ड्रिंक ठरतील फायदेशीर ) काळमेघ- काळमेघ (Kalmegha) हे एक अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक औषध आहे. Androgrpahics paniculata या नावानेही ते ओळखलं जातं. डेंग्यूचा ताप कमी करण्यात हे अत्यंत गुणकारी मानलं जातं. या औषधाची थोडीशी कडू चव डेंग्युच्या लक्षणांवर खूप परिणामकारक असते असं तज्ज्ञांचं मत आहे. विशेष सूचना वर उल्लेख केलेली सर्व औषधं ही डेंग्यूची लक्षणं कमी करण्यात किंवा त्यावरील उपचारांमध्ये खरोखरंच उपयुक्त आहेत; पण डेंग्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णाने जवळच्या आयुर्वेदिक किंवा अन्य कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच त्याचा वापर करावा.
First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या