Home /News /heatlh /

डायबेटिस रुग्णांना मोठा दिलासा! आता इन्सुलिन इंजेक्शनची गरजच पडणार नाही, उपचाराचा नवा मार्ग सापडला

डायबेटिस रुग्णांना मोठा दिलासा! आता इन्सुलिन इंजेक्शनची गरजच पडणार नाही, उपचाराचा नवा मार्ग सापडला

diabetes Prevention

diabetes Prevention

डायबेटिजवरील उपचाराचं हे संशोधन यशस्वी झालं तर डायबेटिसच्या रुग्णाला इन्सुलिन टोचण्याची गरज भासणार नाही.

मुंबई,  06 ऑगस्ट : डायबेटिस (Diabetes) अर्थात मधुमेह हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. डायबेटिसमुळे डोळ्यांचे विकार, किडनी आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते. डायबेटिस हा शरीरात गुंतागुंत निर्माण करणारा आजार आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, लठ्ठपणा, अनुवंशिकता आदी गोष्टींमुळे डायबेटिस होतो, असं तज्ज्ञ सांगतात. एकदा डायबेटिसचं निदान झालं की तो पूर्ण बरा होत नाही. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाला विशेष प्रयत्न करावे लागतात. डायबेटिस असलेल्या काही रुग्णांना रोज इन्शुलिनचं (Insulin) इंजेक्शन घ्यावं लागतं. शरीरातील इन्शुलिन निर्मितीची प्रक्रिया बिघडल्याने डायबेटिस नियंत्रणात राहण्यासाठी काही रुग्णांना बाह्य इन्शुलिनवर अवलंबून राहावं लागतं; पण डायबेटिसच्या रुग्णाला कदाचित भविष्यात बाह्य इन्शुलिनवर अवलंबून राहावं लागणार नाही. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? ऑस्ट्रेलियातल्या (Australia) संशोधकांनी यावर संशोधन सुरू केलं असून, त्यांना ठोस निष्कर्ष दिसून आले आहेत. हे संशोधन यशस्वी झालं तर डायबेटिसच्या रुग्णाला इन्शुलिन टोचण्याची गरज भासणार नाही. `टीव्ही 9 हिंदी`ने या विषयी माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधक सध्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात गुंतले आहेत. अशा प्रकारचं हे पहिलंच संशोधन आहे. या संशोधकांनी एक पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीमुळे शरीरात इन्शुलिनची फेरनिर्मिती (Insulin Reproduction) होईल. हे संशोधन सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. पण डायबेटिसवर ठोस इलाज मिळण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या संशोधन अभ्यासात संशोधकांना एक मार्ग सापडला आहे. ज्याव्दारे स्वादुपिंडाच्या स्टेम सेल्समध्ये (Stem Cells) स्वतःहून इन्शुलिन बनवण्याची प्रक्रिया होऊ शकते. हे शक्य झाल्यास डायबेटिस टाइप-1 (Diabetes Type-1) आणि डायबेटिस टाइप -2 (Diabetes Type-2) च्या उपचारांतील एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रकाशितदेखील झालं आहे. मोनाश विद्यापीठातील डायबेटिस तज्ज्ञ प्रा. सॅम अल ओस्ता आणि डॉ. इशांत खुराना यांनी हे संशोधन केलं आहे. हे वाचा - Foods to avoid for diabetes : फक्त गोड खाणं सोडून फायदा नाही; डायबेटिज रुग्णांनी 'हे' पदार्थही खाऊ नयेत या संशोधकांनी जी पद्धत विकसित केली आहे, त्यामुळे डायबेटिस टाइप -1मुळे नष्ट झालेल्या पेशींची जागा नव्या पेशी घेतील आणि त्या इन्शुलिन उत्पादित करू शकतील. ``सध्या यात अजून सखोल संशोधन गरजेचं आहे. पण हे संशोधन यशस्वी झालं तर डायबेटिसच्या रुग्णांवर ठोस उपचार करता येतील,`` असं संशोधकांनी सांगितलं. संशोधनादरम्यान, संशोधकांनी डायबेटिस टाइप -1 असलेल्या रुग्णाने दान केलेल्या स्वादुपिंडाच्या (Pancreas) पेशींचा अभ्यास केला. या वेळी त्यांनी अमेरिकेच्या आरोग्य एजन्सीनं मान्यता दिलेल्या एका औषधाचा वापर केला. सध्या हे औषध डायबेटिसवर उपचारांसाठी वापरलं जात नाही. या औषधाच्या माध्यमातून स्वादुपिंडातल्या स्टेम सेल्स पुन्हा सक्रिया करण्यात संशोधकांना यश आलं. तसेच `इन्शुलिन एक्सप्रेसिंग` तयार करण्यातही संशोधक यशस्वी झाले. `या संशोधनामुळे डायबेटिसच्या रुग्णांना इन्शुलिनचं इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही,`असा दावा प्रा. अल ओस्ता आणि डॉ. खुराना या दोन संशोधकांनी केला आहे. प्रा. अल ओस्ता म्हणाले, ``आम्हाला माहिती आहे की, आमचं संशोधन खूप खास आहे आणि डायबेटिससाठी नवीन उपचार शोधण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. `` हे वाचा - Diabetes Prevention : डायबिटीज होऊ नये म्हणून काय करावं? मधुमेह टाळण्यासाठी हे आहेत उपाय ``या संशोधनादरम्यान स्वादुपिंडातील मृत पेशींच्या जागी नव्या पेशी सक्रिय व्हाव्यात यासाठी संशोधकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मधुमेहग्रस्त स्वादुपिंड इन्शुलिन निर्मिती करु शकत नाही. परंतु, ते पुन्हा सक्रिय करता येतं,`` असं प्रा. अल ओस्ता यांनी सांगितलं.
First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle

पुढील बातम्या