मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Reheating Food : अन्नपदार्थांना स्वतःच्या हातानेच बनवताय 'विष'; तुमची ही सवयच जीवावर बेतेल

Reheating Food : अन्नपदार्थांना स्वतःच्या हातानेच बनवताय 'विष'; तुमची ही सवयच जीवावर बेतेल

काही पदार्थ पुन्हा गरम केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. जाणून घ्या असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्याचे नुकसान होते.

काही पदार्थ पुन्हा गरम केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. जाणून घ्या असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्याचे नुकसान होते.

काही पदार्थ पुन्हा गरम केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. जाणून घ्या असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्याचे नुकसान होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 8 सप्टेंबर : मोठ्या संख्येच्या भारतीय लोकांना जेवताना गरम अन्न हवे असते. त्यासाठी लोक गॅसवरच अन्न पुन्हा पुन्हा गरम करतात किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करतात. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या सवयीमुळे तुमच्या जेवणाची पौष्टिक गुणवत्ता तर खराब होतेच पण तुमच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. त्याचबरोबर काही पदार्थ पुन्हा गरम केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. जाणून घ्या असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्याचे नुकसान होते.

मांसाहार

मांसाहारी म्हणजे चिकन, मांस हे प्रोटीनचे उत्तम स्रोत मानले जातात. पण शिळे मांसाहारी पदार्थ पुन्हा गरम करून खाल्याने अन्नातून विषबाधा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. मांसाहार ताजे खाणे केव्हाही चांगले. उच्च प्रोटीनयुक्त अन्न नायट्रोजनने भरलेले असते जे पुन्हा गरम केल्यानंतर सेवन केल्यास हानिकारक ठरू शकते.

Deepika Padukone Fitness : दीपिका पदुकोणसारखं फिट आणि स्टायलिश दिसायचंय? पाहा दीपिकाचं फिटनेस रुटीन

भात

शिळा भात पुन्हा गरम केल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. भात पुन्हा गरम केल्याने भातामध्ये वाढणारे बॅसिलस सेरियस नावाचे अत्यंत प्रतिरोधक बॅक्टेरिया होऊ शकतात आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.

पालक

पालक शरीरासाठी खूप हेल्दी फूड मानले जाते याचे अनेक फायदे आहेत. परंतु जर पालक पुन्हा गरम केला तर त्यामध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ तयार होऊ लागतात.

बटाटा

जर बटाटे वारंवार गरम केले तर क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाचा जीवाणू त्यात वाढू शकतो आणि व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे सर्व पोषक घटक देखील नष्ट करू शकतो.

मशरूम

स्वयंपाक केल्यानंतर एक दिवस मशरूम वापरण्यासाठी साठवू नका. मशरूम हे प्रोटीनचा चांगले स्त्रोत आहेत आणि त्यात भरपूर खनिजे असतात. परंतु पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीन नष्ट होतात आणि विषारी पदार्थ तयार होतात जे तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात.

अंडा

अंड्यांमध्ये भरपूर पौष्टिकता असते, त्यामुळे याला सुपरफूडचा दर्जा दिला जातो, पण ते शिजवल्यानंतर लगेचच खा, कारण ते गरम केल्यानंतर खाल्ल्याने त्याची चवच बदलत नाही तर आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते.

मीठ आणि सैंधव मिठात नेमका फरक काय? कोणतं आहे आरोग्यासाठी लाभदायक

नायट्रेट समृद्ध अन्न

पालक, हिरव्या पालेभाज्या, गाजर, सलगम, बीट इत्यादी नायट्रेट-समृद्ध भाज्या पुन्हा गरम करणे टाळा. त्यांना पुन्हा गरम केल्याने ते नायट्रेट आणि नंतर नायट्रोजनेसमध्ये बदलतात, जे शरीराच्या ऊतींना हानिकारक ठरू शकतात.

First published:

Tags: Food, Health Tips, Lifestyle