Home /News /heatlh /

'या' व्यक्तीकडे आहे अद्भुत शक्ती; शब्दांचा उच्चारच नाही तर वास आणि चवही कळते!

'या' व्यक्तीकडे आहे अद्भुत शक्ती; शब्दांचा उच्चारच नाही तर वास आणि चवही कळते!

आपण दिवसभरात नेमके किती शब्द (Words) उच्चारतो आणि त्यातून किती कथा तयार होतात, हे आपल्यालाही सांगता येत नाही. कधी कधी काही शब्द किंवा गोष्टी आपल्याला समाधान देतात, तर काही शब्द ऐकून आपल्याला राग येतो.

मुंबई, 6 ऑगस्ट : आपण दिवसभरात नेमके किती शब्द (Words) उच्चारतो आणि त्यातून किती कथा तयार होतात, हे आपल्यालाही सांगता येत नाही. कधी कधी काही शब्द किंवा गोष्टी आपल्याला समाधान देतात, तर काही शब्द ऐकून आपल्याला राग येतो. शब्द आपल्या भावना (Feelings) व्यक्त करतात; पण आपण शब्दांची प्रत्यक्ष अनुभूती (Experience) घेऊ शकत नाही. या गोष्टी सामान्य माणसांच्या झाल्या; पण जगात काही खास व्यक्ती आहेत, ज्यांना शब्द अनुभवण्याची, त्यांची चव घेण्याची आणि टेस्ट करण्याची अद्भुत शक्ती मिळाली आहे. हेन्री ग्रे (Henry Grey) नावाच्या व्यक्तीत अशीच एक अद्भुत शक्ती (Power) आहे. तो आपल्यासारखे नुसते शब्द उच्चारत नाही, तर त्यांचा वास घेऊ शकतो, तसंच त्यांची चव अनुभवू शकतो. या 23 वर्षांच्या व्यक्तीसमोर कोणतंही नाव घ्या, मग तो त्याच्याशी संबंधित वासाबद्दल सांगेल. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. असं का होतं ते जाणून घेऊ या. सायनेस्थेशियामुळे होतात या गोष्टी हेन्री ग्रे यांना सायनेस्थेशिया (Synaesthesia) नावाचा न्यूरोलॉजिकल आजार (Neurological Disease) आहे. त्यामुळे त्याच्या संवेदना एकमेकांमध्ये मिसळून जातात. सहसा सामान्य व्यक्तींमध्ये असं घडत नाही, परंतु, ज्यांना हा विकार आहे, ते कानांनी ऐकलेल्या, डोळ्यांनी वाचलेल्या आणि बोलल्या गेलेल्या गोष्टी टेस्ट (Test) करू शकतात. बारमन म्हणून काम करणाऱ्या हेन्री ग्रे यांच्या बाबतीत असंच आहे. त्यांची ही अवस्था तेव्हा लक्षात आली, जेव्हा ते लहानपणी आपल्या मित्रांच्या नावांनुसार टेस्ट सांगत असत. मनोरंजक गोष्ट अशी आहे, की प्रत्येक नावासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या टेस्ट आहेत, जी कधी खूप चांगली असते तर कधी खूप घाण असते. हा माणूस घेऊ शकतो शब्दांचा वास, चव आणि अनुभव `मिरर`च्या वृत्तानुसार, न्यूकॅसलमधले बारमन (Barman) हेन्री हे प्रत्येक शब्दाशी वेगळी चव आणि वास जोडतात. उदाहरणार्थ, राजकुमारी केट मिडलटन हे नाव त्यांना न मोजता फाडल्या जाणाऱ्या कापडाच्या आवाजाप्रमाणे जाणवतं. कॅमेरॉन डायझच्या नावाला डिस्को बॉलचा वास येतो आणि जेनिफर लॉरेन्स हे नाव उच्चारताच त्यांना चपलांचा वास येतो. युरिनचा वास जाणवणाऱ्या काही घाणेरड्या नावांचाही हेन्री यांनी उल्लेख केला आहे. माणसांची आयडी कार्ड बघताच आपल्याला वेगवेगळे वास आणि चवी जाणवू लागतात, असं ते म्हणतात. विशेष बाब म्हणजे काही नावं ऐकल्यावर त्यांना खाज सुटू लागते, तर काही नावं अत्यंत घृणास्पद गोष्टींची आठवण करून देतात.
First published:

पुढील बातम्या