मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

70 वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म; लग्नानंतर 54 वर्षांनी आईबाबा बनलं वृद्ध दाम्पत्य

70 वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म; लग्नानंतर 54 वर्षांनी आईबाबा बनलं वृद्ध दाम्पत्य

ज्या वयात आजीआजोबा व्हायचं त्या वयात पहिल्यांदाच आईबाबा बनलं दाम्पत्य

ज्या वयात आजीआजोबा व्हायचं त्या वयात पहिल्यांदाच आईबाबा बनलं दाम्पत्य

लग्नानंतर तब्बल 54 वर्षे बाळासाठी प्रयत्न केले. अखेर वयाच्या सत्तरीत वृद्धापकाळात या दाम्पत्याला पहिलं बाळ झालं आहे.

  • Published by:  Priya Lad
जयपूर, 11 ऑगस्ट : आईबाबा होणं हा प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. हे क्षण अनुभवण्यासाठी दाम्पत्य उत्सुक असतात. पण काही लोकांना बरीच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतरही मूल होत नाही. किमान एक मूल व्हावं यासाठी ते कितीतरी प्रयत्न करतात. अशाच दाम्पत्यापैकी एक राजस्थानमधील हे दाम्पत्य. ज्यांनी लग्नानंतर तब्बल 54 वर्षे बाळासाठी प्रयत्न केले. अखेर वयाच्या सत्तरीत ते आईबाबा झाले. वृद्धापकाळात या दाम्पत्याला पहिलं बाळ झालं आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये राहणारं वयाची सत्तरी गाठलेल्या दाम्पत्याला आता आईबाबा होण्याचं सुख लाभलं आहे. झुंझूनुतील सिंघाना गावातील 75 वर्षांचे माजी सैनिक गोपीचंद आणि त्यांची 70 वर्षांची पत्नी पत्नी चंद्रावती यांना त्यांचं पहिलं बाळ झालं आहे.  लग्नानंतर 54 वर्षे ते बाळासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना मूल होत नव्हतं. शेवटी गोपीचंद यांनी दीड वर्षांपूर्वी एका नातेवाईकामार्फत फर्टिलिटी क्लिनिकशी संपर्क केला. आयव्हीएफमार्फत चंद्रावती गर्भवती राहिली. हे वाचा - OMG! उडत्या विमानाच्या छतावर उभी राहिली 93 वर्षांची आजी, हजारो फूट उंचावर खतरनाक स्टंट; Watch Video अलवरच्या इंडो आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे सायंटिफिक डायरेक्टर आणि अँब्रॉयोलॉजिस्ट डॉ. पंकज गुप्ता म्हणाले, चंद्रावती 9 महिन्यांपूर्वी आयव्हीएफ प्रकियेच्या तिसऱ्या प्रयत्नात गर्भवती झाली. त्यावेळी तिच्या आनंदाला पारावर नव्हता. पण वय जास्त असल्याने प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांचा कालावधीत पोटात बाळ सांभाळणं आणि प्रसूती यशस्वी होईल की नाही, याबाबत साशंकता होती. पण अखेर सर्वकाही शक्य झालं. सोमवारी तिने सुदृढ बाळाला जन्म दिला. आता वयाच्या सत्तरीत महिलेने बाळाला जन्म कसा दिला हा सर्वात मोठा प्रश्न. तर या दाम्पत्याने आयव्हीएफची मदत घेतली.  डॉक्टरांच्या मते, इतक्या वयात मुलं जन्माला येण्याची देशभऱात अशी मोजकीच प्रकरणं आहेत. राजस्थानातील हे पहिलं प्रकरण असावं.  ज्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानामार्फत एका वृद्ध दाम्पत्याने बाळाला जन्म दिला आहे. डॉक्टर गुप्ता म्हणाले, जून २०२२ मध्येच आयव्हीएफबाबत कायदा आला आहे. ५० पेक्षा जास्त वयाच्या लोकांवर ही उपचार पद्धती करतायेणार नाही. ज्यात पुरुष आणि महिला दोघांचा समावेश आहे. हे दाम्पत्य नशीबवान ठरलं कारण कायदा लागू होण्यापूर्वी महिला प्रेग्नंट होती. हे वाचा - VIDEO - Paytm वरून भीक, कोट्यवधींची प्रॉपर्टी; आता हेलिकॉप्टरही खरेदी करणार भिकारी गोपीचंद म्हणाले, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आता मलाही मूल झाल्याने आम्ही आमचं कुटुंब पुढे नेऊ शकतो, याचा आनंद मला आहे.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या