मुंबई : कोरानाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Corona) फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या काळात योगसाधना करण्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपल्या दिवसाची सुरुवात योगाने (Yoga) केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढून, फुफ्फुसाची क्षमताही (Lung Capacity) बळकट होईल. तसं तर सगळ्याच प्रकारची योगासनं चांगली आहेत. पण कोणती योगासनं केल्याने फुप्फुसं मजबूत होऊन, कोरोना काळात फायदा होतो हे जाणून घ्यायला हवं.
जे लोक वर्क फ्रॉम होम (Yoga for work from Home) करत आहेत त्यांनीही योगाभ्यास करायला हवा. एकाच जागेवर जास्त वेळ बसल्याने कंबरदुखी, पाठदुखी यासारखे त्रास होतात. पर्वतासन, भुजंगासन यांच्यामुळे कंबर लवचिक बनते, तर फुफ्फुसंही मजबूत बनतात. मार्जरासन करण्याने मणक्यांची हाडं मजबूत होतात. पण योगाभ्यास करताना सावधानताही पाळावी. योगाचे नियम पाळून हळूहळू झेपेल त्याप्रकारे योगसने करावीत.
मार्जरासन
तसतर कॅट वॉक (Cat Walk)जगभर प्रसिद्ध आहे, ‘मार्जरासन’ला इंग्रजीमध्ये कॅट पोज (Cat Pose) म्हणतात. हे आसन केल्याने मणका आणि पाठीच्या स्नायूंची लवचिकता कायम राहते. मार्जरासनात पुढे वाकून मागे वळण्याची क्रिया केली जाते, मार्जरासन आसन शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या आसन क्रियेत मणका ताणला जातो. यासोबत,पाठीचं दुखणं आणि घशाच्या दुखण्यात आराम मिळतो. पचनक्रिया, रक्ताभिसरण सुधारते, पोटातली अनावश्यक चरबी वितळून पोट कमी होते. तणाव दूर होऊन मानसिक शांती मिळते. खांदा आणि मनगट दोन्ही मजबूत बनवते.
ताडासन
‘ताडासना’मुळे संपूर्ण शरीर लवचिक होतं. या योगासनाने स्नायूंमध्ये भरपूर लवचिकता येते. हे शरीराला रिलॅक्स करतं. याशिवाय शरीर सुडौल बनवतं. शरीरातील चरबी आणि पोट कमी होते. ताडासन करण्यासाठी प्रथम सरळ उभे रहा, आपली कंबर आणि मान सरळ ठेवा. आता, आपले हात वर करा आणि श्वास घेतघेत संपूर्ण शरीर खेचा. पायाच्या बोटांपासून हाताच्या बोटांपर्यंत ताण जाणवला पाहिजे. काही काळ त्याच अवस्थेत रहा. श्वासोच्छवास घेत हळूहळू पूर्वस्थितीत या.
(R-Surakshaa : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम)
उष्ट्रासन
उष्ट्रासनाने पाठीचा कणा मजबूत बनतो. या आसन स्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला ‘उष्ट्रासन’ असे म्हणतात. या आसनामुळे गुडघे, ब्लॅडर, किडनी, यकृत, लिव्हर, फुफ्फुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ट, अपचन, अॅसिडिटी दूर होण्यास मदत होते. श्वासोच्छवास सुधारतो. सुरवातीला वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही हात पुढे घ्या, हळूहळू हात मागे न्या टाचांना पकडण्याचा प्रत्न करा. त्यानंतर शरीराचा पुढचा भाग मागे झुकविण्याचा प्रयत्न करा. मान मागे न्या. थोडावेळ याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना शरीर जास्त ताणू नका.
(Pets ना सांभाळा! महासाथीच्या काळात माणसांमुळे मांजरीलाही झाला कोरोनाचा संसर्ग)
पर्वतासन
या आसनात प्राणवायूची गती उर्ध्व होते. दोन्ही हात आकाशाकडे नेऊन ताणले जातात. या आसनामुळे शरीर बलवान होते. छातीचे विकार दूर होतात. हृदय मजबूत होते, रक्त शुद्धी होते, फुप्फुसाचे रोग बरे होतात. या आसन प्रकारात शारीराल पर्वताप्रमाणे आकार येतो म्हणून त्याला ‘पर्वातासन’ म्हणतात. याला ‘वियोगासनही’ म्हणतात. पर्वातासन करताना सुरवातीला पद्मासनात बसावे, भरपूर श्वास घ्यावा आणि दोन्ही हात वर उचलत आकाशाच्या दिशेने न्यावेत. काहीजण दोन्ही हात सरळ समांतर ठेवतात तर काही हातांची नमस्कार स्थिती करतात. या आसनात जेवढा वेळ श्वास रोखता येईल तेवढा वेळ रोखावा. मग हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात सावकाश गुडघ्यावर टेकवावेत.
(...तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकतो; डॉक्टरांनी केलं सावध)
शशांकासन
शांक म्हणजे ससा. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार सशासारखा दिसतो. म्हणून त्याला शशांकासन म्हणतात. हे आसन ताण-तणाव दूर करण्यास तसेच रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. सर्वप्रथम वज्रासनमध्ये बसा हात गुडघ्यावर ठेवा. गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा. पायाचे चवडे जोडलेले असावेत. हात दोन्ही गुडघ्यांच्या समोर जमिनीवर ठेवून सरळ रेषेत पुढे सरकवावेत. हातांबरोबर डोकं पुढे सरकवत हनवटी पुढे आणावी. नजर समोर ठेवा. या स्थितीत काही काळ राहा आणि वज्रासनात परत या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Fitness, Health Tips, Yoga