नवी दिल्ली, 06 एप्रिल : वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक आहारात प्रथिने आणि लोह सारख्या पोषक घटकांचा समावेश करतात. मात्र, पोटॅशियमदेखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. पोटॅशियम आपल्या शरीरासाठी ट्रेस खनिज आणि इलेक्ट्रोलाइट आहे. हे रक्तदाब पातळी, मज्जातंतू कार्य चांगले राखण्यास मदत करते आणि आपल्या पेशींमध्ये पोषक द्रव्ये पोहोचवते. एका निरोगी व्यक्तीनं दररोज सुमारे 4,700 मिग्रॅ पोटॅशियम घ्यावे, परंतु बहुतेक लोक त्यांच्या आहारात प्रथिने आणि लोह घेण्यावर भर देतात. परंतु, अनेकांना हे माहीत नसते की पोटॅशियमदेखील आहारात खूप महत्त्वाचे आहे. जलद वजन कमी करण्यासाठी पोटॅशियम देखील (Weight Loss Diet) प्रभावी आहे.
केळी
केळी पोटॅशियमचा सर्वोत्तम स्रोत आहे. केळ्यामध्ये फायबरचे योग्य प्रमाण तसेच अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय चांगले ठेवतात. केळे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. फायबर समृध्द आहार खाल्ल्यानं वजन वाढण्याचा धोका 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो. एका केळ्यात 422 मिग्रॅ पोटॅशियम असते.
रताळे
रताळी सामान्यतः हिवाळ्याच्या हंगामात उपलब्ध असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा अत्यंत पौष्टिक संध्याकाळच्या नाश्त्याचा पर्याय आहे. स्टार्च असण्याबरोबरच, त्यात प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी 6 सारखे पोषक घटक असतात. हे व्हिटॅमिन एच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे.
राजमा
राजमा, प्रथिने, फायबर तसेच पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. जे वेगाने वजन कमी करण्यास मदत करते. प्रथिने आणि फायबर तुमचे पोट दीर्घकाळ भरून ठेवतात आणि व्यायामानंतर पोटॅशियमचे सेवन केले पाहिजे. राजमामध्ये फोलेट, लोह, तांबे, व्हिटॅमिन के आणि मॅंगनीज देखील असतात.
हे वाचा - आता झोप पूर्ण होण्याचं टेन्शन विसरा; 4 तासांत घ्या 8 तासांची झोप; कशी ते वाचा
वजन कमी करण्यासाठी आहारासोबत हायड्रेटेड राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते, तसेच तुमच्या शरीरात कमी झालेली अनेक पोषक द्रव्ये पुन्हा भरून निघतात. नारळाच्या पाण्यातील पोषक घटक इलेक्ट्रोलाइट पातळी संतुलित करू शकतात. हे मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम आणि मॅंगनीज आणि पोटॅशियमने समृद्ध आहे. 240 मिली नारळाच्या पाण्यात 600 मिलीग्रॅम पोटॅशियम असते.
हे वाचा - गोड, रसाळ असलं तरी उन्हाळ्यात हे फळ भरपूर खा; वजन राहील नियंत्रणात
पालक
पालकमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वे पुरवतात. पालकमध्ये ल्यूटिन आणि झॅन्थिनसह अनेक संयुगे असतात, जे डोळे देखील निरोगी ठेवतात. पालक खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss