मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Poop Transplant मुळे आयुष्य वाढणार; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार विचित्र उपचार

Poop Transplant मुळे आयुष्य वाढणार; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार विचित्र उपचार

Poop हा शब्द वाचूनच तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण शास्त्रज्ञांनी कॅन्सरवर हा विचित्र असा उपाय शोधला आहे, जो जितका विचित्र तितकाच प्रभावीदेखील असल्याचं दिसून आलं आहे.

Poop हा शब्द वाचूनच तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण शास्त्रज्ञांनी कॅन्सरवर हा विचित्र असा उपाय शोधला आहे, जो जितका विचित्र तितकाच प्रभावीदेखील असल्याचं दिसून आलं आहे.

Poop हा शब्द वाचूनच तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण शास्त्रज्ञांनी कॅन्सरवर हा विचित्र असा उपाय शोधला आहे, जो जितका विचित्र तितकाच प्रभावीदेखील असल्याचं दिसून आलं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 17 फेब्रुवारी : कॅन्सरवर (cancer) तसे बरेच उपचार आहेत. रेडिओथेरेपी, रेडिएशन थेरेपी, हार्मोन थेरेपी पण कधी पूप ट्रान्सप्लांट इम्युनोथेरेपीबाबत (Poop Transplant) ऐकलं आहे का? Poop हा शब्द वाचूनच तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण शास्त्रज्ञांनी कॅन्सरवर हा विचित्र असा उपाय शोधला आहे, जो जितका विचित्र तितकाच प्रभावीदेखील असल्याचं दिसून आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी Poop Transplant चा कॅन्सर रुग्णांवर प्रयोग करून पाहिला. हा उपचार कॅन्सर रुग्णांना वाचवू शकतो, असं अभ्यासात सिद्ध झालं आहे. सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. पूप ट्रान्सप्लांट ज्याला वैद्यकीय भाषेत फिकल माइक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन (Fecal Microbiota Transplantation) म्हणतात. ज्या रुग्णांवर कॅन्सरच्या औषधांचा प्रभाव दिसत नव्हता, अशा 15 कॅन्सर रुग्णांचं पूप ट्रान्सप्लांट केलं. यानंतर सहा रुग्णांच्या शरीरावर औषधाचा प्रभाव होऊ लागला. त्यांच्या शरीरातील ट्यमुर कमजोर होऊ लागला आणि आजार नियंत्रित होऊ लागला. या रुग्णांच्या शीररातील कॅन्सरशी लढण्याची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहिली. त्यांना आधीप्रमाणे औषधाचा अधिक डोस घेण्याची गरज पडली नाही. हे वाचा - कोरोना लॉकडाऊनमध्ये हजारो नवजात चिमुकल्यांचा मृत्यू; मुंबईतील आकडेवारी धक्कादायक त्यांच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचे इन्युन सेल्स म्हणजे प्रतिकारक पेशी विकसित होऊ लागल्या, अँटिबॉडीज तयार झाल्या. या प्रतिकारक पेशी आणि अँटिबॉडीज कॅन्सरला रोखू लागल्या. युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि कॅन्सर इम्युनोलॉजिस्ट डॉ. हसनी जरॉर यांनी सांगितलं, शरीरातील पेशींतून IL-8 केमिकल निघतं. हे केमिकल कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतं. जेव्हा पूप ट्रान्सप्लांट होतं तेव्हा या केमिकल्सची निर्मिती वाढते. ज्यामुळे शरीरातील कॅन्सर निष्क्रिय होऊ लागतो आणि प्रतिकारक शक्ती वाढते. जर कॅन्सर रुग्णांचं पूप ट्रान्सप्लांट केलं तर 40 टक्के रुग्णांना वाचवू शकतो. या उपचारात आतड्यांमधील कॅन्सरचे सूक्ष्मजीव निष्क्रिय होतात आणि योग्य, कॅन्सरशी लढणारे सूक्ष्मजीव विकसित झाले तर रुग्णांना कॅन्सरविरोधात लढण्याची प्रतिकार क्षमतादेखील विकसित होते. ज्यामुळे कॅन्सर शरीरात पसरण्यापासून रोखता येऊ शकतं आणि ट्युमरसुद्धा कम करता येऊ शकतो. हे वाचा - अरे देवा! कर्ज फेडलं नाही म्हणून Underwear सुद्धा सोडली नाही; चक्क लिलावात काढली त्वचेचा कॅन्सर म्हणजे एडवांस्ड मेलानोमा (Advanced Melanoma) असलेल्या रुग्णांसाठी हा उपचार फायदेशीर ठरेल. "पूप ट्रान्सप्लांट सर्व रुग्णांसाठी फायदेशीरच ठरेल असं नाही. पण जर 40 लोकांनादेखील याचा फायदा होत असेल त्यांचं आयुष्य वाढत असेल तर काही वाईट नाही:, असंही जरॉर म्हणाले.
First published:

Tags: Cancer, Health, Serious diseases

पुढील बातम्या