नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : देशात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने रुग्णांमध्ये प्लेटलेट्स (Platelet) कमतरता होण्याची समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत औषधांद्वारे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्याबरोबरच अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की रुग्णाला तत्काळ प्लेटलेट्स द्याव्या लागतात. त्यामुळे रक्तदानाप्रमाणेच लोकांना प्लेटलेट्स दान (Platelet Donation) करण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. मात्र, रक्तदानाच्या तुलनेत प्लेटलेट्स दान करण्याबद्दल लोकांच्या मनात अजूनही काही शंका आहेत.
अलीकडे देशात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर प्लेटलेट दान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, परंतु, दरम्यानच्या काळात असे काही लोक आढळून आले आहेत ज्यांनी प्लेटलेट्स दान केले पण त्यानंतर लगेचच त्यांना डेंग्यूची लागण झाली आणि त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली की प्लेटलेट्स दिल्याने तर आजार झाला नाही ना? मात्र, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे माजी संचालक डॉ. एम सी मिश्रा म्हणतात की प्लेटलेट्स दान केल्यानं कधी प्लेटलेट्सची कमतरता उद्भवत नाही. त्याऐवजी एखादी व्यक्ती 48 तासांनंतर पुन्हा प्लेटलेट्स दान करू शकते.
हे वाचा - अशोक वाटिकेतून सीता मातेची ही खूण पोहचणार थेट अयोध्येत; श्रीलंकेचे दोन मंत्री येणार भारतात
डॉ. मिश्रा सांगतात की, सध्या प्लेटलेट्स दान केल्यानंतर काहींना डेंग्यू झाल्याच्या केसेस समोर आल्या आहेत, त्याचा प्लेटलेट्स दान करण्याशी काहीही संबंध नाही. एखाद्याने प्लेटलेट दान केले आणि त्यानंतर लगेचच त्याला डेंग्यूचा डास चावला आणि नंतर त्याची तब्येत बिघडली हा योगायोग असू शकतो. डेंग्यूच्या तापातून बरा झाल्यानंतरच रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी होतात किंवा कमी होण्याची शक्यता असते. समोर आलेल्या काही प्रकरणांमध्येही हेच दिसून आले आहे. त्यामुळे प्लेटलेट्स दान करणं पूर्णपणे सुरक्षित आहे.
ते सांगतात की पूर्वी जे डॉक्टर प्लेटलेट्स घेत असत, त्यांचे तंत्र काहीसे वेगळे होते, पण आता प्लेटलेट ऍफेरेसिस मशीनमुळे ते खूप सोपे झाले आहे. या मशीनद्वारे रक्तदात्याच्या शरीरातून फक्त प्लेटलेट्स काढल्या जातात. यासाठी रक्तदात्याला या मशिनला जोडले जाते. मात्र. प्लेटलेट किटमध्ये फक्त प्लेटलेट्स जमा करून उर्वरित रक्त पुन्हा त्याच्या शरीरात पोहोचवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेस सुमारे 40 ते 60 मिनिटे लागतात. विशेष बाब म्हणजे या मशिनमधून गोळा केलेल्या प्लेटलेट्सची संख्या रुग्णाच्या शरीरात एकावेळी 50-60 हजार प्लेटलेट्सने वाढवता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips