Home /News /heatlh /

लहान मुलांनाही corona vaccination दिली जाणार? लसीकरणादरम्यान समोर आली मोठी माहिती

लहान मुलांनाही corona vaccination दिली जाणार? लसीकरणादरम्यान समोर आली मोठी माहिती

Pfizer Corona vaccine trial on kids : फायझरने लहान मुलांवर केलेल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी करण्यात आला आहे.

    वॉशिंग्टन, 31 मार्च : जगभरात प्राधान्यक्रमानुसार कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं जातं आहे. भारतात आतापर्यंत वयस्कर व्यक्ती आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या पण इतर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस दिली जात होती. पण आता 1 एप्रिलपासून  45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. तर काही देशांमध्ये वयस्कर व्यक्ती, इतर आजार असलेल्या व्यक्तींसह लठ्ठ व्यक्तीही कोरोना लसीकरणाऱ्या प्राधान्य यादीत आहेत. दरम्यान अद्यापही प्रेग्नंट महिला आणि लहान मुलांना कोरोना लस दिली जात नाही आहे. पण आता लवकरच लहान मुलांचंही लसीकरण (Corona vaccination of kids) सुरू होण्याची शक्यता आहे. फायझरची कोरोना लस (Pfizer corona vaccine) 12 ते 15 वयोगटातील मुलांवर  100 टक्के प्रभावी (Corona vaccine trial on kids) ठरली आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या चाचणीचा अहवाल अन्न आणि औषध प्रशासनाला लवकरात लवकर पाठवला जाणार आहे, असं कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोलुरा यांनी सांगितलं. आता लवकरात लवकर या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यासाठी आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी फायझर आणि बायोएनटेक तयारीत आहे. हे वाचा - आता प्राण्यांनाही दिली जाणार कोरोना लस; लवकरच होणार लसीकरण 12 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये फायझरच्या कोरोना लशीचं  तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल झालं. या ट्रायलमध्ये दिसून आलं की, प्रौढांना जशा समस्या जाणवल्या तशाच समस्या किशोरवयीन मुलांमध्येही दिसून आल्या. विशेष म्हणजे 16 ते 25 वयोगटातील लोकांनी लस घेतल्यानंतर जितक्या अँटिबॉडीज तयार झाल्या त्यापेक्षा जास्त अँटिबॉडीज या मुलांमध्ये दिसून आल्या. आता शाळा सुरू व्हायच्या आधी मुलांना कोरोना लस देण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. हे वाचा - नागपुरातील कोरोना रुग्णांची भयंकर अवस्था; रुग्णालयातील भयावह PHOTO आले समोर फायझरने आता 6 महिने ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी सुरू केल्याचं गेल्या आठवड्यात सांगितलं. फायझरशिवाय यूएसमधील मॉडर्नाने डिसेंबर, 2020 मध्ये 12 ते 17 वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी सुरू केली. तर आता 12 पेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी केली जात असल्याचं  16 मार्च, 2021 ला सांगितलं. जॉन्सन अँड जॉन्सनने तर लहान मुलांवर चाचणी केल्यानंतर आता बाळ आणि नवजात बालकांवरही चाचणी करण्याची योजना आखली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india, Covid-19, Small child

    पुढील बातम्या