मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

EPFO: PF खातेधारकांनो! नॉमिनी निवडणं आवश्यक, नाहीतर कुटुंबियांना होईल त्रास

EPFO: PF खातेधारकांनो! नॉमिनी निवडणं आवश्यक, नाहीतर कुटुंबियांना होईल त्रास


पीएफ खातेधारक केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब नसेल, तर

पीएफ खातेधारक केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब नसेल, तर

पीएफ खातेधारक केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब नसेल, तर

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशने (EPFO) आता PF खातेधारकांना नॉमिनी निवडणं अनिवार्य केलं आहे. ज्या सदस्यांनी आतापर्यंत हे काम केलेलं नाही, त्यांना ईपीएफओने काही सुविधांपासून वंचित ठेवलंय. ज्यांनी ई-नॉमिनेशन केलं नाही, ते आता पीएफ अकाउंटमधील बॅलन्स ऑनलाइन तपासू शकणार नाहीत. पीएफ अकाउंटसाठी ई-नॉमिनेशन करणं खूप सोपंय. हे करायला जास्त वेळ लागत नाही आणि भविष्यातही त्याचा उपयोग होतो.

नॉमिनीची निवड करण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे हे केल्यास पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर ती रक्कम खातेदार ज्याला देऊ इच्छित होता त्याच्याकडे जाते. ई-नॉमिनेशन पीएफ खातेदार आणि त्याच्या कुटुंबाला पीएफ फायदे मिळवून देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर एखाद्या पीएफ सबस्क्रायबरचा मृत्यू झाला तर ई-नॉमिनेशन केल्यावर प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, विम्याचे फायदे ऑनलाइन क्लेम आणि सेटलमेंट सहज शक्य आहे. ई-नॉमिनेशनसाठी खातेदाराकडे सक्रिय UAN आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. खातेदार घरी बसून ई-नॉमिनेशन ऑनलाइनही करू शकतात.

कुणाला नॉमिनी बनवता येतं?

पीएफ खातेधारक केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब नसेल, तर तो कोणत्याही व्यक्तीला आपला नॉमिनी म्हणून घोषित करू शकतो. दुसर्‍याला नॉमिनी केल्यानंतर, कुटुंबाबद्दल माहिती मिळाल्यास आधीचं कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीचं नॉमिनेशन रद्द केलं जातं. जर एखाद्या पीएफ खातेधारकानी नॉमिनी न केलाच नाही आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना पीएफचे पैसे मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांच्या वारसांना पीएफसाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टात जावं लागतं. त्यामुळे नॉमिनेशन केलं असेल, तर त्यामुळे या सर्व त्राग्यापासून सुटका होईल.

ऑनलाइन ई-नॉमिनेशनची पद्धत

EPFO ची अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करा.

‘सर्व्हिस’ टॅबमध्ये, ड्रॉप-डाउन मेन्यूमधून ‘फॉर एम्प्लॉइज’ टॅबवर क्लिक करा.

आता तुमच्या UAN ने लॉग इन करा.

मॅनेज टॅब दिसेल. यामध्ये ई-नॉमिनेशन निवडा.

आता तुमचा कायमचा आणि वर्तमान अॅड्रेस भरा.

फॅमिली डिक्लेरेशन बदलण्यासाठी येसवर क्लिक करा.

नॉमिनीची माहिती भरा आणि सेव्हवर क्लिक करा.

आता ई-साइन आइकॉनवर क्लिक करा आणि पुढे जा.

तुमचा आधार क्रमांक भरा आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मिळालेला OTPदेखील भरा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आता तुमचं नॉमिनेशन अपडेट होईल.

अशा रितीने तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटच्या नॉमिनीचं नाव अपडेट करू शकता.

First published: