मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रंग याचा वेगळा! तरुणाला पाहून डॉक्टर हैराण; वैद्यकीय क्षेत्रासमोरही नवं आव्हान

रंग याचा वेगळा! तरुणाला पाहून डॉक्टर हैराण; वैद्यकीय क्षेत्रासमोरही नवं आव्हान

या रुग्णाच्या शरीराचा रंग हळूहळू पांढर्‍यावरून गडद होत असून, यामागचे कोणतेही कारण डॉक्टरांना समजलेले नाही.

या रुग्णाच्या शरीराचा रंग हळूहळू पांढर्‍यावरून गडद होत असून, यामागचे कोणतेही कारण डॉक्टरांना समजलेले नाही.

या रुग्णाच्या शरीराचा रंग हळूहळू पांढर्‍यावरून गडद होत असून, यामागचे कोणतेही कारण डॉक्टरांना समजलेले नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Pooja Jagtap

वॉशिंग्टन, 01 ऑक्टोबर : प्रत्येक माणसाच्या त्वचेचा एक वेगळा रंग असतो. उन्हात आणि सावलीत राहिल्यामुळे माणसाच्या रंगात थोडाफार फरक असला तरी तो कायमस्वरूपी बदलत नाही. माणसाचा खरा रंग परत येतो. मात्र जर एखाद्या व्यक्तीचा एकदा डल झाल्यानंतर सलग सावळा होत गेला तर ती नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.

यूएसच्या लुईझियानामध्ये राहणारा असाच रुग्ण वैद्यकीय शास्त्रासाठीही आव्हान बनला आहे. या रुग्णाच्या शरीराचा रंग हळूहळू पांढर्‍यावरून गडद होत असून, यामागचे कोणतेही कारण डॉक्टरांना समजलेले नाही. टायलर मॉंक नावाच्या 34 वर्षीय व्यक्तीचा रंग खूप बदलला आहे आणि तो असा दावा करतो की हे त्याच्या अँटी-डिप्रेसंट औषधांमुळे झाले आहे.

व्यक्तीचा रंग गोऱ्यावरून काळा होत चालला आहे

पेशाने पेस्ट कंट्रोल फील्ड इन्स्पेक्टर असलेले टायलर मँक नैराश्य आणि तणावाची तक्रार करत होते. त्यांनी जानेवारी 2021 रोजी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यांना प्रोझॅक नावाचे एक अतिशय सामान्य अँटी-डिप्रेसंट औषध लिहून दिले गेले. या औषधाने त्याच्या मानसिक ताणतणावात आणि मनःस्थितीत कोणताही बदल झाला नाही

मात्र यानंतर काही महिन्यांनंतर त्याला त्याच्या त्वचेमध्ये वेगळ्या प्रकारचा फरक दिसू लागला. दोन मुलांचा बाप असलेल्या टायलरची त्वचा काळी पडू लागली. या घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे आणि त्याच्या त्वचेच्या रंगात आता बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.

बापरे! ब्रेड चावताच पडला तरुणाचा दात; वयाच्या 29 व्या वर्षीच पूर्ण बत्तीशी गायब

डॉक्टरांनाही वाटले आश्चर्य

त्याची कहाणी एका टिकटॉक व्हिडीओद्वारे समोर आली आहे, ज्यामध्ये टायलर स्वतः म्हणतो की त्याचे डॉक्टर देखील हे रहस्य सोडवू शकत नाहीत. सुरुवातीला हे टॅनिंग मानले जात होते, परंतु उन्हापासून दूर राहूनही रंग गडद होत गेला. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; फोटो पाहून धक्काच बसेल

काही लोकांनी गंमतीने त्याला मायकल जॅक्सन रिव्हर्स मोड म्हटले, तर काही लोकांनी याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या टायलर यांना तज्ज्ञांच्या टीमला हे बदल दाखवण्यास सांगितले आहे.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle