मराठी बातम्या /बातम्या /heatlh /केरळमध्ये अवयव प्रत्यारोपणातून मिळाले दोन हात, याप्रकारची भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया, नेमकं हे कसं घडलं?

केरळमध्ये अवयव प्रत्यारोपणातून मिळाले दोन हात, याप्रकारची भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया, नेमकं हे कसं घडलं?

अमरेशला त्याचे दोन्ही हात विनोद या 54 वर्षांच्या व्यक्तीमुळे मिळाले आहेत.

अमरेशला त्याचे दोन्ही हात विनोद या 54 वर्षांच्या व्यक्तीमुळे मिळाले आहेत.

अमरेशला त्याचे दोन्ही हात विनोद या 54 वर्षांच्या व्यक्तीमुळे मिळाले आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Kerala, India

  कोच्ची, 17 सप्टेंबर : अवयव प्रत्यारोपणाच्या (Organ Transplant) शस्त्रक्रिया भारतात आता अनेक ठिकाणी केल्या जात आहेत. त्यासाठी लागणारं कौशल्य व साधनसुविधा देशात मिळू लागल्या आहेत. नुकतीच केरळमधील कोच्चीमध्ये संपूर्ण हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अशाप्रकारे संपूर्ण हाताचं प्रत्यारोपण करण्याची ही देशातली पहिलीच (First Full Arm Transplant In India) शस्त्रक्रिया आहे. आज तक हिंदीनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

  एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, कर्नाटकातील यादगीरमधील गुलबर्गा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीतील (GESCOM) ज्युनिअर पॉवर मॅन अमरेश याचा काही वर्षांपूर्वी वीजेचा झटका बसून, अपघात झाला होता. 25 वर्षांच्या अमरेशचे त्यात दोन्ही हात निकामी झाले होते. सप्टेंबर 2018मध्ये त्यानं केरळ नेटवर्क फॉर ऑर्गन शेअरिंगमध्ये (KNOS) अवयव प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर त्याच्यावर आता दोन्ही हातांचं प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

  अमरेशला त्याचे दोन्ही हात विनोद या 54 वर्षांच्या व्यक्तीमुळे मिळाले आहेत. विनोद कोल्लम यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी 2022मध्ये त्यांना ब्रेड डेड जाहीर करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या अवयवांचं दान करण्याची तयारी दाखवली. केरळच्या कोच्चीमधील अमृता रुग्णालयात हे प्रत्यारोपण करण्यात आलं.

  डॉ. सुब्रमण्यम अय्यर आणि डॉ. मोहीत शर्मा यांच्या नेतृत्वातील 20 शल्य चिकित्सक आणि 10 भूलतज्ज्ञांच्या टीमनं ही (Kerala Team Of Doctors Made A Successful Arm Transplant) शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. त्यासाठी 18 तास लागले. खांद्यापासून संपूर्ण हाताच्या प्रत्यारोपणाच्या आजवर जगात तीनच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचं डॉ. अय्यर यांनी सांगितलं.

  अमृता रुग्णालयातील सेंटर फॉर प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी या विभागाचे ते प्रमुख आहेत. अमरेश याच्यावर दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रुग्णाचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

  भारतात सध्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. काही वेळा अवयवदाता प्रत्यारोपणकर्त्याच्या भागातच असतो. मात्र काही वेळा दोन व्यक्ती वेगवेगळ्या भागात असू शकतात. अशा वेळी त्या अवयवाच्या वाहतुकीसाठी मार्ग तयार करण्याचं आव्हान असतं. अवयव प्रत्यारोपणाबाबत काही संस्था, रुग्णालयं काम करतात. त्यांच्या माध्यमातून अवयवदाते मिळू शकतात. मात्र, भारतात अजूनही हे प्रमाण कमी आहे.

  हेही वाचा - ती तरुणासमोर प्रेमानं येऊन उभी राहिली, पण त्यानंतर तिनं जे केलं; ते धक्कादायक, पाहा VIDEO

  अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत अवयव दानाची समस्या असते. ब्रेड डेड रुग्णांचं अवयवदान करताना त्यांच्या नातेवाईकांकडून अवयवदानासाठी संमती मिळत नाही. त्यामुळे अनेक अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे.

  First published:

  Tags: Kerala