Post Covid : कोरोनातून बरे झालेल्या 10 पैकी 7 जणांना जाणवतेय समस्या; तुम्हीही नेहमीचे म्हणून दुर्लक्ष करताय का?

Post Covid : कोरोनातून बरे झालेल्या 10 पैकी 7 जणांना जाणवतेय समस्या; तुम्हीही नेहमीचे म्हणून दुर्लक्ष करताय का?

कोरोनाच्या पोस्ट इफेक्टच्या रूपाने अनेक गंभीर आजार सतत समोर येत आहेत. ज्यामध्ये शरीराच्या काही अवयवांवर वाईट परिणाम झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : कोरोनाच्या (Corona) विळख्यात सापडलेले लोक यातून सावरले असले तरी त्याचा परिणाम अजूनही लोकांना त्रास देत आहे. कोरोनाच्या पोस्ट इफेक्टच्या रूपाने अनेक गंभीर आजार सतत समोर येत आहेत. ज्यामध्ये शरीराच्या काही अवयवांवर वाईट परिणाम झाला आहे. त्याचबरोबर वायू प्रदूषण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि धकाधकीच्या जीवनामुळे केसाशी संबंधित समस्या समोर येत आहेत. पोस्ट कोविड आजारांमध्ये केसांच्या समस्याही दिसून येत (post covid effect) आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे लोक या आजाराच्या विळख्यात आले होते, आता त्यातून बरे झाल्यानंतर बहुतेकांना केस गळण्याची समस्या जाणवत आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजगोपाल एस यांनी सांगितले की, कोरोनानंतर अचानक केस गळण्याच्या समस्येने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. हा प्रकार 10 पैकी 7 जणांमध्ये आढळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचा - आता पाण्याच्या इंधनावर चालणार गाड्या; पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीत मोठा दिलासा

डॉ. राजगोपाल म्हणतात की, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदात पोस्ट कोविड ओपीडी अनेक महिन्यांपासून सुरू केली गेली आहे. ज्यामध्ये कोरोनामधून बरे झालेल्या लोकांना कोणतीही समस्या असेल तर ते येऊ शकतात. या ओपीडीमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. त्यामध्ये केस गळणे किंवा तुटणे, पांढरे होणे अशा समस्या असलेले बरेच रुग्ण येत आहेत. विशेष म्हणजे अॅलोपॅथी किंवा इतर कोणत्याही मार्गाने उपचार घेण्याऐवजी या आजाराचे रुग्ण सर्वाधिक आयुर्वेदाकडे येत आहेत. इतर अनेक आयुर्वेद केंद्रांवरही असे रुग्ण येत असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा - Explainer : या देशांना अर्ध्या किमतीत पेट्रोल-डिझेलची निर्यात करतो भारत; जाणून घ्या काय आहे गणित

कोरोनामुळे जास्त ताण, पौष्टिक आहाराचा अभाव, हार्मोनल बदल, व्हिटॅमिन डी आणि बी12 ची कमतरता, व्हिटॅमिन सीची कमतरता इत्यादी केस गळण्याची मूळ कारणे असू शकतात. मात्र, एआयआयएमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यापूर्वी सर्वांची चौकशी करण्यात येत असून, त्यामागील कारणांचीही माहिती गोळा केली जात आहे. जेणेकरून कोविडनंतर या बदलामागील विशिष्ट कारणे शोधता येतील.

Published by: News18 Desk
First published: October 26, 2021, 9:24 PM IST

ताज्या बातम्या