मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

इम्युनिटी वाढवण्याच्या नादात तुम्ही हळदीचे अतिसेवन तर करत नाही ना? होतील हे दुष्परिणाम

इम्युनिटी वाढवण्याच्या नादात तुम्ही हळदीचे अतिसेवन तर करत नाही ना? होतील हे दुष्परिणाम

सामान्यतः हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मनाली जाते. मात्र काहीवेळा हळदीचे अतिसेवन काही बाबतीत तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे हळद मर्यादित प्रमाणातच खावी.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 24 जुलै : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लोक हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कारण हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? हळदीचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारकदेखील ठरू शकते. हळदीचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

पोट बिघडणे

जास्त प्रमाणात हळद खाल्याने पोटात जळजळ होणे, पोट फुगणे आणि पेटके येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात भाज्यांच्या सेवनादरम्यान मर्यादित प्रमाणात हळद दररोज शरीरात पोहोचते. अशा स्थितीत हळदीचे वेगळे जास्त सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हळद मर्यादित प्रमाणात खावी.

Fever Primary Care : ताप आल्यावर काय करावं? घरी प्राथमिक काळजी कशी घ्यावी?

लोहाची कमतरता

शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि लोह कमी असल्याने रक्ताची कमतरता जाणवते. परंतु हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील लोह कोरडे होऊ लागते. ज्यामुळे अशक्तपणासोबतच इतर समस्याही वाढू शकतात.

किडनी स्टोन

जास्त हळद खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्यादेखील उद्भवते. हळदीमध्ये असलेले ऑक्सलेट नावाचे तत्व शरीरात कॅल्शियम योग्य प्रकारे विरघळू देत नाही. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

गर्भपात

गरोदर महिलांसाठीही हळदीचे जास्त सेवन केल्याने केवळ आईच नाही तर बाळालाही हानी पोहोचते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

Kidney Stone: वारंवार पोटदुखीसह ही 8 लक्षणं दिसली तर किडनी स्टोनचा त्रास

मळमळ, जुलाब

हळदीचे जास्त सेवन केल्याने मळमळ, उलट्या आणि जुलाबाची समस्यादेखील होऊ शकते. यामध्ये असलेले कर्क्यूमिन पचनाशी संबंधित समस्या वाढवू शकते, ज्यामुळे उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Side effects