Home /News /heatlh /

दीर्घकाळ कोविड असणाऱ्या आठपैकी एका व्यक्तीला जाणवतात ही लक्षणं; दुर्लक्ष नका करू

दीर्घकाळ कोविड असणाऱ्या आठपैकी एका व्यक्तीला जाणवतात ही लक्षणं; दुर्लक्ष नका करू

कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून जगभरात जवळपास 500 मिलियन रुग्णांची नोंद (coronavirus cases) झाली आहे. मात्र, जास्त काळ कोविड असलेल्या लोकांमध्ये अनेक लक्षण अनेक दिवस राहत आहेत, ही काळजी वाढवणारी गोष्ट आहे.

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : कोरोनाची(Corona) रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तरी त्याचे परिणाम अजूनही दिसून येत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना अजूनही त्याची काही लक्षणं जाणवत आहेत. कोरोना झालेल्या आठपैकी एका रुग्णाला (One Out Of Eight) दीर्घकालीन कोविडची लक्षणं जाणवत असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंतच्या सर्वांत व्यापक अभ्यासातून गुरुवारी (4 ऑगस्ट 22) ही गोष्ट समोर आली आहे. कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून जगभरात जवळपास 500 मिलियन रुग्णांची नोंद (More than half a billion coronavirus cases) झाली आहे. मात्र जास्त काळ कोविड असलेल्या लोकांमध्ये अनेक लक्षण अनेक दिवस राहत आहेत, ही काळजी वाढवणारी गोष्ट आहे. मात्र, कोविड दीर्घकाळ असणारे रुग्ण (Long Covid) आणि ज्यांना कधीही कोविडचा संसर्ग (Never Infected) झाला नाही अशा रुग्णांचा तुलनात्मक अभ्यास सध्याच्या एकाही संशोधनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोग्याच्या काही समस्या या कोविडच्या व्हायरसमुळे निर्माण होत नाहीत हे त्यावरून स्पष्ट होऊ शकलं असतं. The Lancet जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये नेदरलँडमधील 76,400 जणांना दीर्घकाळ कोविडची 23 सर्वसामान्य लक्षणांबद्दलची (Common Symtpoms) ऑनलाईन प्रश्नावली भरण्यास सांगण्यात आलं होतं. मार्च 2020 ते ऑगस्ट 2021 या काळात प्रत्येक सहभागी व्यक्तीने 24 वेळा ही प्रश्नावली भरली. या काळात 4,200 पेक्षा जास्त लोकांना म्हणजे 5.5 टक्के लोकांना कोविड झाल्याची माहिती आहे. कोविड झालेल्यांपैकी 21 टक्के लोकांना संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच महिन्यांनंतर एकतरी नवीन किंवा अत्यंत गंभीर असं लक्षण दिसत असल्याचंही स्पष्ट झालं. तर ज्यांना कोविड झालेला नाही अशा नियंत्रित गटातील 9 टक्के लोकांनाही अशीच लक्षणं असल्याचं नोंदवण्यात आलं. म्हणजेच ज्यांना कोविड झाला आहे असे 12.7 टक्के लोक – म्हणजे आठपैकी एकाला दीर्घकालीन लक्षणं असल्याचं यावरून स्पष्ट होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं. कोविड होण्यापूर्वीची आणि नंतरची लक्षणंही या संशोधनात नोंदविण्यात आली. त्यामुळे संशोधकांना या विषाणूशी नेमकं काय संबंधित आहे हे शोधण्यास मदत झाली. कोविडच्या दीर्घकालीन लक्षणांमध्ये छातीत दुखणं, श्वास घेण्यात त्रास, स्नायूंमध्ये वेदना, चव आणि वास घेण्याची क्षमता जाणं आणि थकवा ही लक्षणं नोंदवण्यात आली. “ही संपूर्ण मानवजातीवर परिणाम करणारी अत्यंत गंभीर समस्या आहेस” असं डच युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनीन्गेन (Dutch University of Groningen) या अभ्यासातील एक लेखक अरांका बॅलरिंग (Aranka Ballering) यांनी सांगितलं. “ ज्यांना कोणताही संसर्ग झालेला नाही अशा नियंत्रित गटातील लक्षणे आणि ज्यांना सार्स – कोविड – 2 चा (SARS- COVID-2) संसर्ग झाला आहे त्यांची आधी आणि नंतरची लक्षणे यांचा अभ्यास करण्यात आला. कोरोनाच्या लाटेमुळे घालण्यात आलेले निर्बंध आणि अशाश्वता यामुळे काही स्ट्रेस म्हणजेच ताणासारखी काही लक्षणे आम्हाला संसर्ग न झालेल्या गटातही दिसून आली, ” असं त्या म्हणाल्या. मात्र या अभ्यासात नंतर आलेले डेल्टा (Delta) किंवा ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरिएंट्सचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला नव्हता ही या अभ्यासाची मर्यादा होती असं या अभ्यासात सहभागी संशोधकांनी सांगितलं. तसंच कोविडचं एक दीर्घकालीन लक्षण ब्रेन फॉग (Brain Fog) म्हणजेच मेंदूवर होणारा परिणाम (गोंधळ, विसरणे, लक्ष केंद्रित न करता येणं) या लक्षणाबद्दलही काही माहिती यामध्ये नाही. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर “ आता भविष्यात जे अभ्यास होतील त्यात मानसिक आरोग्याची (Mental Health) लक्षणेही समाविष्ट करणं आवश्यक आहे,” अशी अपेक्षा अभ्यासातील आणखी एक संशोधक ज्युडीथ रोसमॅलन यांनी व्यक्त केली. या मानसिक लक्षणांमध्ये डिप्रेशन, अस्वस्थपणा, ब्रेन फॉग, निद्रानाश आणि अगदी थोडेसे कष्ट केले तरीही थकवा येणे यांचा समावेश होतो. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा ब्रिटनच्या लायश्टर युनिव्हर्सिटीतील तज्ञ ख्रिस्टोफर ब्राईटलिंग आणि रॅशेल एव्हान्स यांनी हा अभ्यास संसर्ग न झालेल्या नियंत्रित गटावरही करण्यात आल्यानं आधीच्या दीर्घकालीन कोविडवर झालेल्या अभ्यासांमधील आणखी एक पुढे टाकलेलं पाऊस असल्याचं म्हटलं आहे. हे दोघेही या संशोधनात सहभागी झाले नव्हते. “ ज्यांनी लस घेतली आहे त्यांना किंवा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये दीर्घकालीन कोविडचं प्रमाण कमी असल्याचं अन्य अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीतून स्पष्ट होतं, ”अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
First published:

Tags: Corona updates, Health, Health Tips

पुढील बातम्या