मराठी बातम्या /बातम्या /heatlh /अरे वाह! वजन कमी करण्याचा रामबाण उपाय; स्वयंपाक घरात वापरली जाणारी 'ही' पावडर ठरेल उपयुक्त

अरे वाह! वजन कमी करण्याचा रामबाण उपाय; स्वयंपाक घरात वापरली जाणारी 'ही' पावडर ठरेल उपयुक्त

निरोगी जीवनासाठी अनेक आरोग्य फायदे मिळविण्यासाठी पोहणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. केवळ शरीर टोन होत नाही तर चरबी लवकर बर्न होते.

निरोगी जीवनासाठी अनेक आरोग्य फायदे मिळविण्यासाठी पोहणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. केवळ शरीर टोन होत नाही तर चरबी लवकर बर्न होते.

हा पदार्थ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाची समस्या नियंत्रणात ठेवण्यातही मदत करतो.

    नवी दिल्ली, 15 मार्च:  वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. वजन कमी करण्यासाठी व्यायामासह आहारावरही नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट्सचं (Diates) प्रस्थ वाढलं आहे. अनेक तज्ज्ञांकडून अशी वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स सुचवली जातात. अनेकदा यात आपल्या स्वयंपाकघरातल्या काही पदार्थांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व माहीत नसतं. अशाच एका पदार्थाची सध्या चर्चा सुरू आहे. हा पदार्थ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाची समस्या नियंत्रणात ठेवण्यातही मदत करतो. काय आहे हा पदार्थ, माहीत आहे? हा पदार्थ आहे आमचूर पावडर (Mango Powder). 'झी न्यूज'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    आमचूर पावडर म्हणजे आंब्याची पावडर. कैरी सुकवून त्याची पावडर केली जाते. आपल्या स्वयंपाकघरात (Kitchen) नेहमी वापरली जाते. आमचूर पावडरची चव आंबट असते. आंबटपणाचा स्वाद जिथं गरजेचा आहे तिथं याचा आवर्जून वापर केला जातो. चिमूटभर आमचूर पावडरीमुळे भाजीची चव पूर्णपणे बदलून जाते. अर्थात, आमचूर पावडरचा वापर सरसकट सर्व भाज्यांमध्ये केला जात नाही, तर काही निवडक भाज्यांमध्येच आमचूर पावडर वापरली जाते. भाजीची चव वाढवणारी ही आमचूर पावडर वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही अगदी उपयुक्त आहे.

    सावधान! तुम्हीही Non-Veg खाता का? मग तुम्हाला होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

    आमचूर पावडरीमध्ये कॅल्शियम (Calcium), व्हिटॅमिन सी (Vitamin C), फॅट, तसंच लोह असतं. त्यात अँटिऑक्सिडंट (Anti Oxident) गुणधर्मही आहेत. अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे चयापचयाची (Metabolism) क्रिया सुरळीत करून वजन घटवण्यास मदत होते. आमचूर पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आमचूरच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात. आमचूर पावडरचा आहारात समावेश केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. आमचूर पावडरमुळे पित्तही कमी होतं.

    याशिवाय आमचूरचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल (Cholestrol) आणि मधुमेहावरही (Diabetes) नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे मधुमेह असेल तर आहारात आमचूरचा अवश्य समावेश करावा, असा सल्ला दिला जातो. कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यात उपयुक्त असल्यानं हृदयाचं कार्य सुधारण्यासही याची मदत होते. आमचूरचं सेवन गर्भवती महिलांसाठीही फायदेशीर असतं. कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, तसंच लोह असल्यानं गर्भवती महिलांना याचा चांगला फायदा होतो. कर्करोगावरही आमचूर उपयुक्त ठरतं. त्वचा चांगली राहण्यासही आमचूर पावडर लाभदायी आहे. वजन नियंत्रित करण्यासाठीही आमचूर अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात आमचूरचा अवश्य समावेश करा.

    First published:

    Tags: Health, Lifestyle, Tips, Weight loss